१५ ऑक्टोबर हा भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन. त्यांच्या ज्ञानप्रेम, पुस्तकांविषयीची ओढ आणि युवकांना वाचनाची प्रेरणा देणाऱ्या विचारांचा सन्मान म्हणून हा दिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ पुस्तक वाचण्याचा नसून, ज्ञानाची कास धरण्याचा, विचारांना दिशा देण्याचा आणि आयुष्यभर शिकत राहण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. "ज्या घरात पुस्तके असतात, त्या घरात विचार जन्म घेतात." कल्पना करा... एका शेतकऱ्याने दोन बियाणे जमिनीत पेरले. पहिले बियाणे पाऊस, ऊन आणि वाऱ्याचा सामना करत मोठे वृक्ष बनले. दुसरे बियाणे भीतीपोटी जमिनीखालीच राहिले... आणि काळाच्या ओघात नष्ट झाले. आपले मनही त्या बियाण्यासारखेच आहे. वाचन म्हणजे मनाला मिळणारे पाणी, खत आणि सूर्यप्रकाश. जितके आपण वाचतो, तितके आपले विचार समृद्ध होतात, निर्णय परिपक्व होतात आणि व्यक्तिमत्त्व अधिक उजळते. आज मोबाईल आपल्याला माहिती (Information) देतो; परंतु पुस्तके आपल्याला समज (Understanding), विवेक (Wisdom) आणि जीवनदृष्टी (Perspective...
जागतिक महिला दिन - सन्मान स्त्री शक्तीचा दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या संघर्षाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि समाजात त्यांना मिळणाऱ्या समान हक्काचा गौरव करण्याचा दिवस आहे. हा केवळ कॅलेंडरचा एक दिवस नसून तर तो उत्सव आहे त्या शक्तीचा जिने जगाला आकार दिला. एकेकाळी चूल आणि मूल या चौकटीत अडकलेली स्त्री आज त्या चौकटी मोडून बाहेर पडली आहे. आज एकही असं क्षेत्र नाही जिथे स्त्रीने आपला ठसा उमटवला नाही. ती केवळ घराची लक्ष्मीच नाही, तर ती देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा देखील बनत आहे. स्त्री ही समाजाचा अविभाज्य घटक असून तिच्या योगदानाशिवाय जगाची प्रगती होणे अशक्य आहे. इतिहास - महिलादिनाची सुरुवात 20व्या शतकाच्या सुरुवातीला झाली. न्यूयॉर्क मधील महिला कामगारांनी कामाचे तास कमी करण्यासाठी आणि मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी मोठे आंदोलन केले होते. त्यांच्या या संघर्षाला यश आले आणि 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च हा दिवस अधिकृतपणे 'जागतिक महिला दिन' म्हणून घोषित केला. स्त्री: एक अष्टपैलू व्यक्तिमत्व - स्त्रीमध्ये सहनशील...