Skip to main content

जागतिक महिला दिन - 8 मार्च

जागतिक महिला दिन - सन्मान स्त्री शक्तीचा 
दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या संघर्षाचा, त्यांच्या  कर्तृत्वाचा आणि समाजात त्यांना मिळणाऱ्या समान हक्काचा गौरव करण्याचा दिवस आहे. हा केवळ कॅलेंडरचा एक दिवस नसून तर तो उत्सव आहे त्या शक्तीचा  जिने जगाला आकार दिला. एकेकाळी चूल आणि मूल या चौकटीत अडकलेली स्त्री आज त्या चौकटी मोडून बाहेर पडली आहे. आज एकही असं क्षेत्र नाही जिथे स्त्रीने आपला ठसा उमटवला नाही. ती केवळ घराची लक्ष्मीच नाही, तर ती देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा देखील बनत आहे. स्त्री ही समाजाचा अविभाज्य घटक असून तिच्या योगदानाशिवाय जगाची प्रगती होणे अशक्य आहे.
इतिहास -
महिलादिनाची सुरुवात 20व्या शतकाच्या सुरुवातीला झाली. न्यूयॉर्क मधील महिला कामगारांनी कामाचे तास कमी करण्यासाठी आणि मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी मोठे आंदोलन केले होते. त्यांच्या या संघर्षाला यश आले आणि 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च हा दिवस अधिकृतपणे 'जागतिक महिला दिन' म्हणून घोषित केला.
स्त्री: एक अष्टपैलू व्यक्तिमत्व -
स्त्रीमध्ये सहनशीलता आहे म्हणून ती दुर्बल नाही. ती सृजन करू शकते आणि वेळ पडली तर अन्यायाविरुद्ध 
' रणरागिणी' सुद्धा बनू शकते. सावित्रीबाई फुलेंनी पेटवलेली शिक्षणाची ज्योत आज प्रत्येक स्त्रीच्या कर्तृत्वातून लखलखत आहे . आजच्या काळात स्त्रीने स्वतःला सिद्ध केले आहे. भारतात जिजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि कल्पना चावला यासारख्या अनेक स्त्रियांनी इतिहास घडवला आहे.आजची स्त्री ही केवळ घराची चौकट सांभाळणारी गृहिणी राहिलेली नाही, तर ती आकाशाला गवसणी घालणारी अंतराळवीर आहे, सीमेवर रक्षण करणारी सैनिक आहे आणि देशाला दिशा देणारी राजकारणीही आहे. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची जी ज्योत पेटवली, तिचेच फळ आज आपण पाहत आहोत.
स्त्री ही त्याग, प्रेम आणि बुद्धिमत्तेचा त्रिवेणी संगम आहे. तिचा सन्मान केवळ एका दिवसा पुरता मर्यादित न ठेवता, तो आपल्या संस्काराचा भाग व्हायला हवा!



Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल

आज 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांची जयंती. भारतीय संविधानाचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ , समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतीय  बौद्ध धर्माचे पुनरू ज्ज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. त्यांनी कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटले. डॉ. आंबेडकरांची बुध्दीमत्ता अफाट व अचाट होती. त्यांचे वाचन व लेखन फार मोठे होते. त्यांच्याकडे पंचवीस हजारांवर ग्रंथांचा व्यक्तिगत संग्रह होता. त्यांनी ग्रंथलेखन प्रामुख्याने इंग्रजीतूनच केलेले आहे. मराठी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन मराठीत दिसते. त्यांच्या सर्व ग्रंथांची मराठी भाषांतर उपलब्ध आहेत. योगदान - भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, घटनात्मक, औंद्योगिक  क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. वाचनवेड , पुस्तक प्रेम -  डॉ. आंबेडकर यांना वाचनाचे प्रचंड वेड ...

क-हेचें पाणी - प्र. के. अत्रे

प्र. के. अत्रे  हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व . शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता, उत्कृष्ट वक्ता प्रसिद्ध होते. त्यांचे पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे. उर्फ केशवकुमार नावाने ते लिहत असत. त्यांचे आत्मचरित्र क-हेचें पाणी. याचे पाच खंडात त्यांनी विस्तृत स्वरूपात जीवन प्रवास वर्णन केला आहे झेंडूची फुले' विडंबन काव्य, 'गुद्दे आणि मुद्दे', मन हेलावून टाकणारे त्यांचे समधीवरील अश्रू आणि मनाला हुंदके घालायला लावणारी ' हुंदके' हे ग्रंथ मनात घर करून जातात. हिम्मत काय असते हे आचार्य अत्रे यांचे क-हेचें  पाणी पाच खंडातील २५०१ पृष्टांचे आत्मचरित्र वाचले म्हणजे समजते. समुद्रात अनेक नावाडी नाव सोडून असावेत आणि एकदम अचानक तुफान यावे, तुफान पाहून सर्वच नावाडी माघारी फिरतात, परंतु या तुफानालाही न घाबरता एका नावड्याने आपली नाव तूफानातून पुढेच घेवून जावी आणि किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना वाटावे आता या नावेला कधीही जलसमाधी मिळते की काय? दुसऱ्याच क्षणी नावाड्याने नाव व्यवस्थित तूफानातून बाहेर काढावी आणि किनाऱ्यावरील लोकांनी सांगावे बाबा वळव रे आता माघारी नाव...

वाचन प्रेरणा दिन - 15 ऑक्टोबर 2025

  वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन  संविधान उद्देशिकेचे वाचन करून तसेच पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाची खात्री   या भित्तीपत्रकाचे मा. कुमारराव निकम यांच्या हस्ते उद्घाटन करून साजरा करण्यात आला. भारताचे महान वैज्ञानिक, मिसाईल Man म्हणून ओळखले जाणारे, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस. त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून त्यांनी दिलेला वाचल तर वाचाल या संदेशाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्म दिवस वाचनप्रेरणा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2015 पासून हा दिवस वाचन प्रेरणा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. डॉ. कलाम यांचे जीवन म्हणजे ज्ञानाची अखंड साधना होती. त्यांची गरिबीतून राष्ट्रपती पदापर्यंतची भरारी ही केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेवर व वाचनावरील निस्सिम प्रेमामुळेच शक्य झाले . पुस्तके त्यांचे मित्र होते. त्यांनी अनेक तरुणांना वाचनातून आत्मशोध व प्रगतीचा मार्ग शोधण्यासाठी प्रेरित केले. आजच्या या प्रेरणादिन कार्यक्रमा...