Skip to main content

डॉ.एस. आर. रंगनाथन जयंती - 12 ऑगस्ट 23

               
                    आज 12 ऑगस्ट ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर रंगनाथन यांची जयंती.  ग्रंथालय हे संग्रहालय न होता ती एक संस्था व्हावी चळवळ व्हावी म्हणून अहोरात्र झिजनाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांना विनम्र अभिवादन! 
   ज्या काळात भारतात ग्रंथालयांना फारसे महत्व प्राप्त झालेले नव्हते त्याकाळात इंग्रजी विषयात पहिला वर्ग मिळवून त्यांनी मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल पद स्वीकारले. त्यांनी प्राध्यापक होण्यापेक्षा ग्रंथपाल होणे पसंद केले. त्याचे कारण म्हणजे ते स्वतः ग्रंथप्रेमी होते, ग्रंथालयां बद्दल त्यांच्या मनात आदर होता. ग्रंथालयांच्या माध्यमातून ज्ञान प्रसाराचे कार्य करता येईल हा विश्वास त्यांना होता. एक मात्र खरे की त्यांचा ग्रंथपाल होण्याचा निर्णय ग्रंथालय शास्त्राच्या  आणि ग्रंथालय चळवळीच्या दृष्टीने भाग्याचा ठरला. देशातील ज्ञानाची कवाडे सर्वसामान्यांना विनामूल्य खुली करण्याचा विचार  सर्वप्रथम त्यांनी रुजवला आणि नंतर तो जोपासण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. आदर्श ग्रंथालय कायदा मसुदा तयार केला, ग्रंथालयशास्त्र शिक्षण वर्ग सुरू केले, पदव्युत्तर आणि पी.एच. डी चा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू केले. ग्रंथालयशास्त्र शिक्षणाचा देशात प्रसार होण्यासाठी आणि या शिक्षणाला व्यावसायिक महत्व प्राप्त करून देण्यासाठी डॉ. रंगनाथन यांनी प्रयत्न केल्यामुळेच ग्रंथालय व्यवसायाला देशात मनाचे स्थान मिळाले.भारताची कीर्ती जागतिक ग्रंथालय क्षेत्रात पसरवली, त्यांनी 50 हून अधिक ग्रंथ व 1500 हून अधिक लेख त्यांनी लिहिले. त्यांना अनेक मान सन्मान मिळाले ब्रिटिश सरकारने 1935 मध्ये ' रावसाहेब ' हा किताब दिला. दिल्ली विद्यापीठाने डी. लिट, 1957 साली पद्मश्री .असे अनेक मान सन्मान त्यांना मिळाले.
  सतीचे वाण घेवून डॉ. रंगनाथन यांनी आपले सारे आयुष्य ग्रंथालये व ग्रंथालयशास्त्र  यासाठी वेचले शेवटी त्यांनी 27 सप्टेंबर 1972 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ....

Comments

Popular posts from this blog

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...

लाल बहादुर शास्त्री जयंती: 2 ऑक्टोबर 2024

भारताचे दुसरे पंतप्रधान, लाल बहादूर शास्त्री, आपल्या साधेपणा, देशभक्ती आणि दृढ इच्छाशक्तीसाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाला उजळून दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे निर्णय घेतले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारताने मिळवलेला विजय हा त्यांच्या नेतृत्वाचेच फळ होते. "जय जवान जय किसान" हे त्यांचे प्रसिद्ध घोषणाशब्द आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी देशाच्या सैनिकांचे आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शास्त्रीजींचा साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा पैलू होता. ते अतिशय साधा जीवन जगत होते. त्यांच्या साधेपणामुळेच जनतेचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते. त्यांच्या निधनानंतरही लोक त्यांना आदराची भावना बाळगतात. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला. परंतु त्यांनी कधीही धीर सोडला नाही. त्यांची दृढ इच्छाशक्ती आणि धैर्य हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. आजच्या युव पिढीला शास्त्रीजींच्या जीवनातून बरेच काही शिकायला मिळते. त्यांच्या साधेपणा, दे...

महात्मा गांधी जयंती: 2 ऑक्टोबर 2024

महात्मा गांधी, ज्यांना बापू म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे एक महान नेते होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांवर आधारित एक अद्वितीय स्वातंत्र्य लढा उभारला. त्यांच्या विचारांनी भारतालाच नव्हे तर जगभरातील अनेक देशांना प्रेरणा दिली. अहिंसा आणि सत्याग्रह: गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह ही दोन शक्तिशाली शस्त्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी हिंसाचाराचा विरोध करून, प्रेम आणि करुणेच्या मार्गाने ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडले. त्यांचे सत्याग्रह चळवळी, विशेषतः दांडी यात्रा, जगभरात प्रसिद्ध झाली. भारतीय स्वातंत्र्य संग्राम: गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नवी दिशा मिळाली. त्यांनी खादी चळवळ, असहकार चळवळ आणि भारत छोड़ो आंदोलन सुरू करून ब्रिटिशांना मोठा धक्का दिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. एक विश्व नेता: गांधीजी केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे नेते होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव आफ्रिका, अमेरिका आणि युरोपसारख्या देश...