डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकप्रेमाचा सर्वात मोठा दाखला म्हणजे लोकं स्वतःसाठी घर बांधतात पण त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं होतं. 1933 साली दादरच्या हिंदू कॉलनीत सुरेख अस दुमजली घर बांधले.
राजगृह - या पुस्तकांच्या घराचं नाव त्यांनी एका विद्वानाच्या घराच्या नावावरून ठेवलं. हा विद्वान म्हणजे गौतमबुद्ध त्यांच्या राजेशाही घराच नाव राजगृह होते.
त्यांच्या या पुस्तकघरात आजही लाखांवरची पुस्तके आहेत. पण त्यांनी जेव्हा ही घर बांधल तेव्हा त्यात विविध विषयांवरची शेकडो पुस्तके होती. त्यामध्ये तत्त्वज्ञानाची 6000, अर्थशास्त्राची 1हजार, युद्धशास्त्राची 3 हजार, धर्मशास्त्राची 2हजार, कायद्याची 5 हजार पुस्तके होती. आपल्या या पुस्तकांच्या घरात बाबासाहेब तासनतास ग्रंथ वाचत बसायचे त्यामुळेच बाबासाहेबांना प्रज्ञासुर्य असंही संबोधले जातं.
असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकांसाठी खास घर बांधणारी ही एकमेव व्यक्ती असून त्यांना विनम्र अभिवादन!
संदर्भ....
https://www.esakal.com/ampstories/web-story/dr-babasaheb-ambedkar-personal-library-house-rajgruh-collection-of-50000-books-aau85
Comments
Post a Comment