मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात क्रांतीदिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच आमच्या हिंदमाता शिक्षण मंडळ बोरगांवच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाच्या प्रमुख पाहुण्या डॉ सी. एस. बोधले यांनी वाळवा तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास ह्या विषयावर व्याख्यान दिले.आपल्याच परिसरात वाळवा तालुक्यात झालेले स्वातंत्र्य सैनिक विद्यार्थ्यांना माहिती व्हावे या उद्देशाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
वाळवा तालुका हा सांगली जिल्ह्यातील राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये पुढारलेला तालुका आहे. वाळवा तालुका हा शुर, गुणी व स्वातंत्र्यप्रिय लोकांचा मुलुख म्हणून प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्याचे जसे त्याचे नाव जसे पंचक्रोशीत दोन हात करण्यास दुमदुमत होते तसे स्वातंत्र्योत्तर काळात विकासाच्या सर्व विधायक क्षेत्रात आघाडीवर राहण्याचा प्रयत्नही विशेष उल्लेखनीय आहे हे स्पष्ट आहे. 1892 सली कशाळकर आणि मुंदले यांनी प्रतोद हे वर्तमानपत्र सातारा आणि इस्लामपूर येथे सुरू होते. वाळवा तालुक्यातील लोक जागृत व राष्ट्रप्रेम आष्टा गोविंदराव उर्फ रावसाहेब लिमये हे वकील होते.राष्ट्रीय सभेसाठी वाळवा तालुक्यातील रावसाहेब लिमये व हरिभाऊ तळवलकर आघाडीवर होते.आचार्य जावडेकर यांनी 1921 ते 26 या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाच्या बांधणीचे व प्रचाराचे काम केले.26 जाने 1930 रोजी वाळवा तालुक्यातील लोक व सर्व कार्यकर्ते एकत्रित येवून कायदेभंग केला.
अशा प्रकारे डॉ. सी.एस. बोधले यांनी वाळवा तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास यावर प्रकाशझोत टाकला.
Comments
Post a Comment