मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव येथे आज 2 ऑक्टोंबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. उदय सूर्यवंशी यांनी याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याचा तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या अंगी असलेला साधेपणा, समर्पण, आणि प्रामाणिकपणा या विशेष गुणांमुळे त्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषविले. या कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. वसंत मोरे यांनी मानले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
आज 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. भारतीय संविधानाचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ , समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतीय बौद्ध धर्माचे पुनरू ज्ज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. त्यांनी कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटले. डॉ. आंबेडकरांची बुध्दीमत्ता अफाट व अचाट होती. त्यांचे वाचन व लेखन फार मोठे होते. त्यांच्याकडे पंचवीस हजारांवर ग्रंथांचा व्यक्तिगत संग्रह होता. त्यांनी ग्रंथलेखन प्रामुख्याने इंग्रजीतूनच केलेले आहे. मराठी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन मराठीत दिसते. त्यांच्या सर्व ग्रंथांची मराठी भाषांतर उपलब्ध आहेत. योगदान - भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, घटनात्मक, औंद्योगिक क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. वाचनवेड , पुस्तक प्रेम - डॉ. आंबेडकर यांना वाचनाचे प्रचंड वेड ...
Comments
Post a Comment