भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती १५ आॅक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणादिन साजरा केला जातो. डॉ. अब्दुल कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले.डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते. जसे त्यांच्या मध्ये असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन आणि दिलदार स्वभाव यामुळेच त्यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तुत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महसत्ता येणार आहे. भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे हे त्यांनी सांगितले आहे. डॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तिदायी आहे.
तुम्ही सर्व काही करू शकता तुमच्याकडे अदभुत साहस आहे हे पटवून देण्यासाठी The Ignited Minsa , The Luminous Spark, Wings of Fire ,
पुस्तके लिहिली. तुमच्या मेंदूतील आणि चेतना मधील ठिणगीला ओळखले म्हणून त्यांनी प्रत्येकाकडे चेत नेची शक्ती आहे अगदी प्रत्येक मुलाकडे म्हणून त्यांनी You are Born to Blossom पुस्तक लिहिले. डॉ. कलाम हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते.2020 सालात प्रगत भारताचे सप्न त्यांनी सर्व भारतीयां समोर ठेवले व त्यामुळे देशात वैचारिक पातळीवर एका वेगळ्या पर्वाला सुरुवात झाली . प्रगत भारताचे डॉ. कलाम यांचेस्वप्न पूर्ण करायचे असेल तर विद्यार्थी सुसंस्कारित होणे गरजेचे आहे. वाचनामुळे मनावर संस्कार होतात, विचारांना चालना मिळते, काय चांगले काय वाईट यातील फरक कळतो. आणि म्हणूनच विद्यार्थ्याना वाचनास प्रवृत्त करण्यासाठी डॉ. कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो.
काळानुसार वाचनाची माध्यमे बदलली असली तरी वाचनाचे महत्व कमी झालेले नाही. शरीराचा जसा व्यायाम गरजेचा असतो तसेच मेंदूसाठी वाचन महत्वाचे असते. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाचे आहे. वाचाल तर वाचाल ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जाणतो. परन्तु आजच्या तरुण पिढीला वाचनाचे वेड असायला हवे तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल. वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुध्दीची मशागत होते. माणसाचे व्यक्तिमत्त्व विकास वाचनामुळे होतो. डॉ. कलाम नेहमीच म्हणत " पुस्तकाच्या सहवासात ज्ञानाबरोबर नेहमीच मला आनंद मिळाला आहे. ग्रंथ ही माझी सर्वात मौल्यवान अशी ठेव आहे." युवक वाचतील तर देश वाचेल अशी त्यांची खात्री होती. वाचाल तर वाचाल असे आपण नेहमीच म्हणतो पण त्या बोलण्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होवो हीच त्यांना आदरांजली.!
Comments
Post a Comment