Skip to main content

Posts

Showing posts from March, 2026

जागतिक महिला दिन - 8 मार्च

जागतिक महिला दिन - सन्मान स्त्री शक्तीचा   दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या संघर्षाचा, त्यांच्या  कर्तृत्वाचा आणि समाजात त्यांना मिळणाऱ्या समान हक्काचा गौरव करण्याचा दिवस आहे. हा केवळ कॅलेंडरचा एक दिवस नसून तर तो उत्सव आहे त्या शक्तीचा  जिने जगाला आकार दिला. एकेकाळी चूल आणि मूल या चौकटीत अडकलेली स्त्री आज त्या चौकटी मोडून बाहेर पडली आहे. आज एकही असं क्षेत्र नाही जिथे स्त्रीने आपला ठसा उमटवला नाही. ती केवळ घराची लक्ष्मीच नाही, तर ती देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा देखील बनत आहे. स्त्री ही समाजाचा अविभाज्य घटक असून तिच्या योगदानाशिवाय जगाची प्रगती होणे अशक्य आहे. इतिहास - महिलादिनाची सुरुवात 20व्या शतकाच्या सुरुवातीला झाली. न्यूयॉर्क मधील महिला कामगारांनी कामाचे तास कमी करण्यासाठी आणि मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी मोठे आंदोलन केले होते. त्यांच्या या संघर्षाला यश आले आणि 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च हा दिवस अधिकृतपणे 'जागतिक महिला दिन' म्हणून घोषित केला. स्त्री: एक अष्टपैलू व्यक्तिमत्व - स्त्रीमध्ये सहनशील...