आज 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. भारतीय संविधानाचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ , समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतीय बौद्ध धर्माचे पुनरू ज्ज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. त्यांनी कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटले. डॉ. आंबेडकरांची बुध्दीमत्ता अफाट व अचाट होती. त्यांचे वाचन व लेखन फार मोठे होते. त्यांच्याकडे पंचवीस हजारांवर ग्रंथांचा व्यक्तिगत संग्रह होता. त्यांनी ग्रंथलेखन प्रामुख्याने इंग्रजीतूनच केलेले आहे. मराठी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन मराठीत दिसते. त्यांच्या सर्व ग्रंथांची मराठी भाषांतर उपलब्ध आहेत.
योगदान - भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, घटनात्मक, औंद्योगिक क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे.
वाचनवेड , पुस्तक प्रेम -
डॉ. आंबेडकर यांना वाचनाचे प्रचंड वेड होतं. परदेशात शिकायला असताना त्यांच्याकडे पुस्तके खरेदीसाठी पैसे नसत तेव्हा ते ग्रंथालयात जावून ग्रंथालय जितके वेळ उघडं असेल तितका वेळ ते तिथे पुस्तक वाचत असत. इंग्लंड मध्ये शिकत असताना ते ब्रिटिश म्युझियम मध्ये ते वाचनासाठी जात असत. त्याठिकाणी घडलेला सँडविच किस्सा सर्वांना माहीत आहेच. सलग 12 तास वाचन करीत असत. राजगृह या घरात खालच्या मजल्यावर माणसे राहायची आणि वरचा मजला पुस्तकांसाठी ठेवला होता. बाबासाहेब म्हणत " तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक, कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचं ते शिकवेल".
एकदा परदेशातून त्यांनी पाठविलेली पुस्तके असणारी बोट बुडाली तेव्हा ते पुस्तकांच्या विरहात दोन दिवस रडत होते. बाबासाहेब यांचं पुस्तकांवर पराकोटीच प्रेम होते.
डॉ. आंबेडकर यांची ग्रंथ संपदा व लेखन -
भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने लिहले नसेल तेवढे लेखन डॉ. आंबेडकर यांनी लिहलेले आहे. ग्रंथ, प्रबंध, लेख, भाषणे, पत्रे, स्फुटलेख, शोधनिबंध अश्या विविध स्वरूपात त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांनी लिहिलेली पत्रे सुधा त्यांच्या साहित्याचा एक भाग आहे. त्यांनी लिहिलेल्या हजारो पत्रांतून त्यांचे विचार स्पष्ट असून ती पत्रे इंग्रजी, मराठी व काही इतर भाषेत आहेत. त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता, प्रबुद्ध भारत अशी वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये काढली होती. आज डॉ. आंबेडकर यांचे साहित्य व विचार भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे.
डॉ. आंबेडकर यांनी मिळविलेल्या पदव्या जर बघितल्या तर त्यावरून त्यांची विद्ववत्ता लक्षात येते. प्रचंड हाल अपेष्टा सोसून आणि कष्ट करून फकत ज्ञानग्रहण करणारे अद्वितीय असे ज्ञानोपासक म्हणजे डॉ. आबासाहेब आंबेडकर. त्यांची प्रचंड ज्ञानलालसा , वाचन, चिंतन, लेखन, मनन विविधांगी व्यासंग बघितल्यावर असा चौफेर बुद्धिमान माणूस शोधूनही सापडणार नाही. अशा या महान नेत्याला विनम्र अभिवादन !
Comments
Post a Comment