सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती.1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव येथे त्यांचा जन्म झाला. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य संपदा _ पोवाडे व लावणी 15, नाटके 7, प्रवासवर्णन 1, कथा 21, कादंबरी 31, चित्रपट 7 एवढे साहित्य संपदा त्यांनी आपल्या 49 वर्षात केलेले दिसते. त्यांनी सर्वसामान्य कष्टकरी, दलित शोषित, कामगारांचे जिवंत अनुभव मांडण्यासाठी त्यांनी आपली लेखणी हत्यारासारखी वापरली. त्यामुळेच त्यांचे साहित्य जन सामान्यांच्या काळजात आजही अजरामर आहे. त्यांच्या कथेचे नायक हे सर्वसामान्य कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधत्व करतात.
सर्व सामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहिरी करत त्यांनी आयुष्यभर वांचिंतासाठी समाज प्रबोधन केले. लेखणी आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या फकिरा या कादंबरीला राज्यसरकारचा उत्कृष्ट कादंबरी हा पुरस्कार मिळाला आहे. अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्र चळवळीत जनजागृतीचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान त्यांचे आहे. त्यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा व चालना देणारे असे आहे.अवघे दीड दिवस शाळेत शिक्षण घेवून त्यांनी विशाल,अजरामर असे साहित्य निर्माण केले. लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या मनामध्ये चेतना निर्माण करून स्फुल्लिंग पेटवले. अण्णाभाऊंच्या लेखणीने अनेक आंदोलनाला पाठबळ मिळाले त्याप्रकारे आजच्या नव युवकांमधून तशी पावले उचलली जावीत .
अण्णाभाऊ साठे 18 जुलै 1969 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
Comments
Post a Comment