Skip to main content

Posts

वाचन प्रेरणा दिन - 15 ऑक्टोबर 2025

  वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन  संविधान उद्देशिकेचे वाचन करून तसेच पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाची खात्री   या भित्तीपत्रकाचे मा. कुमारराव निकम यांच्या हस्ते उद्घाटन करून साजरा करण्यात आला. भारताचे महान वैज्ञानिक, मिसाईल Man म्हणून ओळखले जाणारे, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस. त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून त्यांनी दिलेला वाचल तर वाचाल या संदेशाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्म दिवस वाचनप्रेरणा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2015 पासून हा दिवस वाचन प्रेरणा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. डॉ. कलाम यांचे जीवन म्हणजे ज्ञानाची अखंड साधना होती. त्यांची गरिबीतून राष्ट्रपती पदापर्यंतची भरारी ही केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेवर व वाचनावरील निस्सिम प्रेमामुळेच शक्य झाले . पुस्तके त्यांचे मित्र होते. त्यांनी अनेक तरुणांना वाचनातून आत्मशोध व प्रगतीचा मार्ग शोधण्यासाठी प्रेरित केले. आजच्या या प्रेरणादिन कार्यक्रमा...
Recent posts

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन - इंग्रजी विभागा मार्फत भित्तीपत्रकाचे उद्घाटन

23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट दिवस म्हणून ओळखला जातो. 1995 या वर्षी पासून जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी  भारतातही पुस्तकदिन साजरा केला जातो. लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी भारतातील अनेक भागांमध्ये त्यांचे स्मरण केले जाते. या वर्षीची थीम " तुमच्या मनाला जे आवडेल ते वाचा" आहे.मनाप्रमाणे वाचता आलं तरच मनाप्रमाणे सुंदर जगता येईल. ही थीम मुलांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर वाचनाचा शोध घेण्यास प्रोत्साहित करते. वाचनाची आवड निर्माण करते आणि पुस्तकांच्या जगात त्यांची स्वतःची शैली आणि आनंद शोधण्यासाठी त्यांना सक्षम करते.   मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागा मार्फत जागतिक दिनानिमित्त विल्यम शेक्सपिअर ह्यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, त्यांना मिळालेले पुरस्कार, बक्षीस ह्यासंबंधीत माहिती देणारे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे स्वागत व  प्रास्ताविक बी. ए. भाग एक चा विद्यार्...

14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या पुस्तकप्रेमा बद्दल .....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकप्रेमाचा सर्वात मोठा दाखला म्हणजे लोकं स्वतःसाठी घर बांधतात पण त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं होतं. 1933 साली दादरच्या हिंदू कॉलनीत सुरेख अस दुमजली घर बांधले. राजगृह - या पुस्तकांच्या घराचं नाव त्यांनी एका विद्वानाच्या घराच्या नावावरून ठेवलं. हा विद्वान म्हणजे गौतमबुद्ध त्यांच्या राजेशाही घराच नाव राजगृह होते. त्यांच्या  या पुस्तकघरात आजही लाखांवरची पुस्तके आहेत. पण त्यांनी जेव्हा ही घर बांधल तेव्हा त्यात विविध विषयांवरची शेकडो पुस्तके होती. त्यामध्ये तत्त्वज्ञानाची 6000, अर्थशास्त्राची 1हजार, युद्धशास्त्राची 3 हजार, धर्मशास्त्राची 2हजार, कायद्याची 5 हजार पुस्तके  होती. आपल्या या पुस्तकांच्या घरात बाबासाहेब तासनतास ग्रंथ वाचत बसायचे त्यामुळेच बाबासाहेबांना प्रज्ञासुर्य असंही संबोधले जातं.  असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकांसाठी खास  घर बांधणारी ही एकमेव व्यक्ती असून  त्यांना विनम्र अभिवादन! संदर्भ.... https://www.esakal.com/ampstories/web-story/dr-babasaheb-ambedkar-personal-library-house-rajgruh-collection-of-...

मोहनराव पतंगराव पाटील बोरगाव महाविद्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त अभिवादन.

 आज महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. कुंडले होते त्यांनी आपल्या भाषणात  महाराष्ट्रात महात्मा जोतीराव फुले यांच्या विद्रोही विचारपरंपरेने व कर्तृत्वाने सामाजिक बदलाचा एक नवा प्रवाह घडला असे नमूद केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमात बी. ए. भाग तीन चे विद्यार्थी कु. मोनिका डांगे, कु. देवराज शेवाळे यांनी ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश बुरुटे यांनी केले.  महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त  त्यांच्या संबंधित माहिती असलेले e resources पुढील प्रमाणे आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा. ज्योतिबा फुले Jyotiba Phule सावित्रीबाई फुले Savitribai Phule MARATHI, HINDI, ENGLISH BOOKS          📚 मराठी बुक्स 📚 1) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समग्र...

महात्मा जोतिबा फुले: एक समाज सुधारक

महात्मा जोतिबा फुले, भारताच्या सामाजिक पुनरुत्थानातील एक अग्रणी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. एका गरीब कुटुंबात जन्मलेले जोतिबा फुले यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजातील अनेक कुप्रथांवर चाबूक चालवला. शिक्षण आणि सामाजिक जागृती: जोतिबा फुले यांनी लहानपणापासूनच समाजातील असमानता आणि अन्याय पाहिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्रियांचे शिक्षण आणि दलित समाजाचे उत्थान यासाठी अथक प्रयत्न केले. भारतातील पहिल्या कन्या शाळेची स्थापना त्यांच्याच प्रयत्नांमुळे शक्य झाली. सत्यशोधक समाज आणि त्यांचे विचार: जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अंधश्रद्धा आणि कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी लिहिलेले 'गुलामगिरी' हे पुस्तक ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेवर एक जोरदार प्रहार होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकास शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. कार्याचा प्रभाव: जोतिबा फुले यांच्या कार्याचा भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाला. त्यांनी स्त्री शिक्षण, ...

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...

लाल बहादुर शास्त्री जयंती: 2 ऑक्टोबर 2024

भारताचे दुसरे पंतप्रधान, लाल बहादूर शास्त्री, आपल्या साधेपणा, देशभक्ती आणि दृढ इच्छाशक्तीसाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाला उजळून दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे निर्णय घेतले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारताने मिळवलेला विजय हा त्यांच्या नेतृत्वाचेच फळ होते. "जय जवान जय किसान" हे त्यांचे प्रसिद्ध घोषणाशब्द आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी देशाच्या सैनिकांचे आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शास्त्रीजींचा साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा पैलू होता. ते अतिशय साधा जीवन जगत होते. त्यांच्या साधेपणामुळेच जनतेचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते. त्यांच्या निधनानंतरही लोक त्यांना आदराची भावना बाळगतात. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला. परंतु त्यांनी कधीही धीर सोडला नाही. त्यांची दृढ इच्छाशक्ती आणि धैर्य हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. आजच्या युव पिढीला शास्त्रीजींच्या जीवनातून बरेच काही शिकायला मिळते. त्यांच्या साधेपणा, दे...

महात्मा गांधी जयंती: 2 ऑक्टोबर 2024

महात्मा गांधी, ज्यांना बापू म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे एक महान नेते होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांवर आधारित एक अद्वितीय स्वातंत्र्य लढा उभारला. त्यांच्या विचारांनी भारतालाच नव्हे तर जगभरातील अनेक देशांना प्रेरणा दिली. अहिंसा आणि सत्याग्रह: गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह ही दोन शक्तिशाली शस्त्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी हिंसाचाराचा विरोध करून, प्रेम आणि करुणेच्या मार्गाने ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडले. त्यांचे सत्याग्रह चळवळी, विशेषतः दांडी यात्रा, जगभरात प्रसिद्ध झाली. भारतीय स्वातंत्र्य संग्राम: गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नवी दिशा मिळाली. त्यांनी खादी चळवळ, असहकार चळवळ आणि भारत छोड़ो आंदोलन सुरू करून ब्रिटिशांना मोठा धक्का दिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. एक विश्व नेता: गांधीजी केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे नेते होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव आफ्रिका, अमेरिका आणि युरोपसारख्या देश...

स्वर्गीय मोहनराव पतंगराव पाटील स्मृतिदिन -1 0जाने. 24

हिंदमाता शिक्षण मंडळ बोरगाव चे आद्य संस्थापक  स्वर्गीय मोहनराव पतंगराव पाटील (अण्णा) यांचा आज स्मृतिदिन. दरवर्षी  अण्णांचा स्मृतिदिन हिंदमाता शिक्षण मंडळ बोरगाव येथे त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेले कार्य यांना उजाळा दिला जातो. 10 जाने ते 17 जाने. या कालावधीत संकुलात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. व्याख्यानमाला, प्रदर्शन, विद्यार्थी  विविध कलागुणदर्शन तसेच विद्यार्थी आरोग्य तपासणी, माता पालक यांच्यासाठी पाककला स्पर्धा, हळदी कुंकू अश्या विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.  स्वर्गीय आण्णा ह्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू  कै. मोहनराव पतंगराव पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू निर्भीड व्यक्तीमत्व –           मोहनराव अण्णांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते. सामाजिक कार्याची तळमळ, स्वच्छ व पारदर्शी कारभार, निर्भीड स्वभाव , ओजस्वी संभाषण  कला ही अण्णांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती. १९६७ मध्ये अण्णा जिल्हा परिषदेवर निवडून आले. राजारामबापूनी त्यांना वाळवा पंचायत समितीचे सभापती केले. ‘तालुक्याच्या सर्वां...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती - 3 जाने. 2024

क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव  फुले     भारतातील पहिल्या महिला शाळेची पहिली महिला शिक्षिका, स्त्रीमुक्ती चळवळीच्या पहिल्या नेत्या, पददलितांच्या कैवारी आणि प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव  फुले यांचे स्थान अढळ आहे. एका अशिक्षित स्त्रीने स्वतः शिक्षण घेऊन शिक्षिका बनावे आणि वर्षानुवर्षे अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणाऱ्यां स्त्री व शूद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखवावा ही गोष्ट भारताच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात अपूर्व अशी आहे.    एकोणिसाव्या शतकात पेशवाईचा अस्त झाला आणि समाजप्रबोधनाची पहाट झाली. समाजप्रबोधनाची प्रक्रिया इतकी वेगवान होती, की प्रत्येक बदल हा क्रांतिकारक स्वरूपाचा होता. जे कधीही घडले नाही, जे कधीही पाहिले नाही अशा घटनांची मालिकाच सुरु झाली.प्रत्येक वाईट प्रथेवर समाजसुधारकांनी प्रहार करून, ती समूळ नष्ट करण्याचा वसाच घेतला होता. या क्रांतिकारक कार्यांनी संपूर्ण समाजजीवनच ढवळून निघाले. एका अन्यायी, अत्याचारी युगाचा अंत होऊन नवीन युगाचा प्रारंभ झाला. या नाव्युगाचे निर्माते आहेत महात्मा जोतीराव  फुल...

वाचन प्रेरणा दिन - 15 ऑक्टोंबर 2023

आज वाचन प्रेरणा दिन ! १५ ऑक्टोंबर या दिवशी आपल्या भारताचे मिसाईल मॅन, आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांची जयंती भारतभर आदरपूर्वक साजरी केली जाते. आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांना जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन. आदरणीय कलाम साहेबांचे जीवनचरित्र आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. आदरणीय कलाम साहेब हे भारतीय विज्ञान विश्वाला असे पोरके करुन निघून गेलेत, जणू त्यांच्या अकाली जाण्यामूळे भारताचे अग्नि पंखच विझलेत. पण या विझलेल्या पंखांनी आपल्या हयातभर, भारताला गरुड झेपेची ताकद दिलीय. प्रेरणा दिली. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनचरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची जयंती आपण "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करीत आहोत. आपण शैक्षणिक जीवनात सतत पुस्तकांच्या सान्निध्यात राहूनही अंतिमत: अवांतर वाचनामुळेच व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे म्हटले जाते. वाचनामुळे विचारांची निश्चित अशी बैठक तयार होण्यास मदत होते, वाचनामुळे विचारही बदलतात, असे वाचनाचे अनेक फायदे आपल्याला सांगणारे बरेच जण असतात. मात्र, काय वाचावे आणि काय वाचल्याने आपल्याला फायदा होईल, हे सांगणा...

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती - 2 ऑक्टोंबर 2023

मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव येथे आज 2 ऑक्टोंबर 2023 रोजी  राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. उदय सूर्यवंशी यांनी याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.  त्यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याचा तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या अंगी असलेला साधेपणा, समर्पण, आणि प्रामाणिकपणा या विशेष गुणांमुळे त्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषविले. या कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. वसंत मोरे यांनी मानले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ.एस. आर. रंगनाथन जयंती - 12 ऑगस्ट 23

                                    आज 12 ऑगस्ट ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर रंगनाथन यांची जयंती.  ग्रंथालय हे संग्रहालय न होता ती एक संस्था व्हावी चळवळ व्हावी म्हणून अहोरात्र झिजनाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांना विनम्र अभिवादन!     ज्या काळात भारतात ग्रंथालयांना फारसे महत्व प्राप्त झालेले नव्हते त्याकाळात इंग्रजी विषयात पहिला वर्ग मिळवून त्यांनी मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल पद स्वीकारले. त्यांनी प्राध्यापक होण्यापेक्षा ग्रंथपाल होणे पसंद केले. त्याचे कारण म्हणजे ते स्वतः ग्रंथप्रेमी होते, ग्रंथालयां बद्दल त्यांच्या मनात आदर होता. ग्रंथालयांच्या माध्यमातून ज्ञान प्रसाराचे कार्य करता येईल हा विश्वास त्यांना होता. एक मात्र खरे की त्यांचा ग्रंथपाल होण्याचा निर्णय ग्रंथालय शास्त्राच्या  आणि ग्रंथालय चळवळीच्या दृष्टीने भाग्याचा ठरला. देशातील ज्ञानाची कवाडे सर्वसामान्यांना विनामूल्य खुली करण्याचा विचार  सर्वप्रथम त्यांनी रुजवला आणि नंतर तो जोपासण्यासाठी आपले...

क्रांति दिन - 9 ऑगस्ट

      मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात क्रांतीदिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच आमच्या हिंदमाता शिक्षण मंडळ बोरगांवच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाच्या प्रमुख पाहुण्या डॉ सी. एस. बोधले यांनी वाळवा तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास ह्या विषयावर व्याख्यान दिले.आपल्याच परिसरात वाळवा तालुक्यात झालेले स्वातंत्र्य सैनिक विद्यार्थ्यांना माहिती व्हावे या उद्देशाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.     वाळवा तालुका हा सांगली जिल्ह्यातील राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये पुढारलेला तालुका आहे. वाळवा तालुका हा शुर, गुणी व स्वातंत्र्यप्रिय लोकांचा मुलुख म्हणून प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्याचे जसे त्याचे नाव जसे पंचक्रोशीत दोन हात करण्यास दुमदुमत होते तसे स्वातंत्र्योत्तर काळात विकासाच्या सर्व विधायक क्षेत्रात आघाडीवर राहण्याचा प्रयत्नही विशेष उल्लेखनीय आहे हे स्पष्ट आहे.  1892 सली कशाळकर आणि मुंदले यांनी प्रतोद हे वर्तमानपत्र  सातारा आणि इस्लामपूर येथे...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती - १ ऑगस्ट 23

    सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती.1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव येथे त्यांचा जन्म झाला. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य संपदा _ पोवाडे व लावणी 15, नाटके 7, प्रवासवर्णन 1, कथा 21, कादंबरी 31, चित्रपट 7 एवढे साहित्य संपदा त्यांनी आपल्या 49 वर्षात केलेले दिसते. त्यांनी सर्वसामान्य कष्टकरी, दलित शोषित, कामगारांचे जिवंत अनुभव मांडण्यासाठी त्यांनी आपली लेखणी हत्यारासारखी वापरली. त्यामुळेच त्यांचे साहित्य जन सामान्यांच्या काळजात आजही अजरामर आहे. त्यांच्या कथेचे नायक हे सर्वसामान्य कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधत्व करतात.  सर्व सामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहिरी करत त्यांनी आयुष्यभर वांचिंतासाठी समाज प्रबोधन केले. लेखणी आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या फकिरा या कादंबरीला राज्यसरकारचा  उत्कृष्ट कादंबरी हा पुरस्कार मिळाला आहे. अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्र चळवळीत जनजागृतीचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान त्यांचे आहे. त्यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा व चालना दे...

राजर्षी शाहू महाराज जयंती -

राजर्षी शाहू महाराज (१८७४-१९२२) जीवन परिचय : कोल्हापूर संस्थानचे राजे, थोर समाजसुधारक, बहुजन समाजाचे उद्धारक, कुशल राज्यकर्ते, समतेचे पुरस्कर्ते, प्रजाहितदक्ष संस्थानिक अशी अनेक विशेषणे धारण केलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून, १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव घाटगे व राधाबाई घाटगे त्यांचे आई-वडील होते. जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे हे कागल जहागिरीच्या थोरल्या पातीचे प्रमुख होते.शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. १८८३ मध्ये कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना औरस पुत्र नव्हता. त्यामुळे चौथे शिवाजी यांच्या विधवा पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले. त्याच वेळी त्यांचे नाव छत्रपती शाहू महाराज असे ठेवले.राजघराण्याच्या प्रथेनुसार शाहू महाराजांचे प्रारंभिक शिक्षण खाजगी शिक्षकामार्फतच झाले. त्यानंतर १८८५ ते १८८९ अशी चार वर्षे शाहू महाराजांचे शिक्षण राजकोट येथील राजकुमारांसाठी असलेल्या कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर कोल्हापूरला परतल्यानंतर त्यांच्या शिक्षणाची जबाब...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल

आज 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांची जयंती. भारतीय संविधानाचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ , समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतीय  बौद्ध धर्माचे पुनरू ज्ज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. त्यांनी कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटले. डॉ. आंबेडकरांची बुध्दीमत्ता अफाट व अचाट होती. त्यांचे वाचन व लेखन फार मोठे होते. त्यांच्याकडे पंचवीस हजारांवर ग्रंथांचा व्यक्तिगत संग्रह होता. त्यांनी ग्रंथलेखन प्रामुख्याने इंग्रजीतूनच केलेले आहे. मराठी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन मराठीत दिसते. त्यांच्या सर्व ग्रंथांची मराठी भाषांतर उपलब्ध आहेत. योगदान - भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, घटनात्मक, औंद्योगिक  क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. वाचनवेड , पुस्तक प्रेम -  डॉ. आंबेडकर यांना वाचनाचे प्रचंड वेड ...

डॉ. अब्दुल कलाम जयंती - वाचन प्रेरणा दिन 15 आॅक्टो.2020

 भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती १५ आॅक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणादिन साजरा केला जातो. डॉ. अब्दुल कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले.डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते. जसे त्यांच्या मध्ये असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन आणि दिलदार स्वभाव यामुळेच त्यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तुत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महसत्ता येणार आहे. भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे हे त्यांनी सांगितले आहे. डॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तिदायी आहे. तुम्ही सर्व काही करू शकता तुमच्याकडे अदभुत साहस आहे हे पटवून देण्यासाठी  The Ignited Minsa , The  Luminous Spark, Wings of Fire  ,  पुस्तके लिहिली. तुमच्या मेंदूतील आणि चेतना मधील ठिणगीला ओळखले म्हणून त्यांनी प्रत्येकाकडे चेत नेची शक्ती आहे अगदी ...

Best Open e resourses

Best Open Access Resources   Following is the list of some best ICT initiatives (India and abroad) with their access link: 1. National Digital Library https://ndl.iitkgp.ac.in/ 2. SWAYAM Online Courses https://storage.googleapis.com/uniquecourses/online.html 3. National Knowledge Network https://nkn.gov.in/ 4. NPTEL https://finptel.ac.in 5. InfoPort https://infoport.inflibnet.ac.in/ 6. Talks to Teacher https://www.ted.com/playlists/182/talks_from_inspiring_teachers 7. A-VIEW http://aview.in/ 8. Virtual Labs https://www.vlab.co.in/ 9. FOSSEE https://fossee.in/ 10. Spoken Tutorial https://spoken-tutorial.org/ 11. e-Yantra https://www.e-yantra.org/ 12. Oscar++ https:////www.it.iitb.ac.in/oscar/ 13. E-Kalpa https://icar.org.in/content/e-kalpa 14. NCERT Text Books http://ncert.nic.in/textbook/textbook.htm 15. Directory of Open Access Books https://www.doabooks.org/ 16. Directory of Open Access Journals https://doaj.org/ 17. Open Knowledge Repository — World Bank https://openknowledge.wo...