Skip to main content

Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल

आज 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांची जयंती. भारतीय संविधानाचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ , समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतीय  बौद्ध धर्माचे पुनरू ज्ज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. त्यांनी कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटले. डॉ. आंबेडकरांची बुध्दीमत्ता अफाट व अचाट होती. त्यांचे वाचन व लेखन फार मोठे होते. त्यांच्याकडे पंचवीस हजारांवर ग्रंथांचा व्यक्तिगत संग्रह होता. त्यांनी ग्रंथलेखन प्रामुख्याने इंग्रजीतूनच केलेले आहे. मराठी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन मराठीत दिसते. त्यांच्या सर्व ग्रंथांची मराठी भाषांतर उपलब्ध आहेत. योगदान - भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, घटनात्मक, औंद्योगिक  क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. वाचनवेड , पुस्तक प्रेम -  डॉ. आंबेडकर यांना वाचनाचे प्रचंड वेड ...

डॉ. अब्दुल कलाम जयंती - वाचन प्रेरणा दिन 15 आॅक्टो.2020

 भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती १५ आॅक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणादिन साजरा केला जातो. डॉ. अब्दुल कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले.डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते. जसे त्यांच्या मध्ये असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन आणि दिलदार स्वभाव यामुळेच त्यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तुत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महसत्ता येणार आहे. भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे हे त्यांनी सांगितले आहे. डॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तिदायी आहे. तुम्ही सर्व काही करू शकता तुमच्याकडे अदभुत साहस आहे हे पटवून देण्यासाठी  The Ignited Minsa , The  Luminous Spark, Wings of Fire  ,  पुस्तके लिहिली. तुमच्या मेंदूतील आणि चेतना मधील ठिणगीला ओळखले म्हणून त्यांनी प्रत्येकाकडे चेत नेची शक्ती आहे अगदी ...

Best Open e resourses

Best Open Access Resources   Following is the list of some best ICT initiatives (India and abroad) with their access link: 1. National Digital Library https://ndl.iitkgp.ac.in/ 2. SWAYAM Online Courses https://storage.googleapis.com/uniquecourses/online.html 3. National Knowledge Network https://nkn.gov.in/ 4. NPTEL https://finptel.ac.in 5. InfoPort https://infoport.inflibnet.ac.in/ 6. Talks to Teacher https://www.ted.com/playlists/182/talks_from_inspiring_teachers 7. A-VIEW http://aview.in/ 8. Virtual Labs https://www.vlab.co.in/ 9. FOSSEE https://fossee.in/ 10. Spoken Tutorial https://spoken-tutorial.org/ 11. e-Yantra https://www.e-yantra.org/ 12. Oscar++ https:////www.it.iitb.ac.in/oscar/ 13. E-Kalpa https://icar.org.in/content/e-kalpa 14. NCERT Text Books http://ncert.nic.in/textbook/textbook.htm 15. Directory of Open Access Books https://www.doabooks.org/ 16. Directory of Open Access Journals https://doaj.org/ 17. Open Knowledge Repository — World Bank https://openknowledge.wo...

भारतीय शासक

🔆🔅🔆 भारतीय शासक 🔆🔅🔆  ♻️गुलाम वंश ♻️ 1=1193 मुहम्मद  घोरी 2=1206 कुतुबुद्दीन ऐबक  3=1210 आराम शाह 4=1211 इल्तुतमिश 5=1236 रुकनुद्दीन फिरोज शाह 6=1236 रज़िया सुल्तान 7=1240 मुईज़ुद्दीन बहराम शाह 8=1242 अल्लाउदीन मसूद शाह 9=1246 नासिरुद्दीन महमूद   10=1266 गियासुदीन बल्बन 11=1286 कै खुशरो 12=1287 मुइज़ुदिन कैकुबाद 13=1290 शमुद्दीन कैमुर्स 1290 गुलाम वंश समाप्त् (शासन काल-97 वर्ष लगभग ) ♻️खिलजी वंश♻️ 1=1290 जलालुदद्दीन फ़िरोज़ खिलजी  2=1296  अल्लाउदीन खिलजी  4=1316 सहाबुद्दीन उमर शाह 5=1316 कुतुबुद्दीन मुबारक शाह 6=1320 नासिरुदीन खुसरो  शाह 7=1320 खिलजी वंश स्माप्त (शासन काल-30 वर्ष लगभग ) ♻️तुगलक  वंश ♻️ 1=1320 गयासुद्दीन तुगलक  प्रथम  2=1325 मुहम्मद बिन तुगलक दूसरा    3=1351 फ़िरोज़ शाह तुगलक  4=1388 गयासुद्दीन तुगलक  दूसरा 5=1389 अबु बकर शाह 6=1389 मुहम्मद  तुगलक  तीसरा 7=1394 सिकंदर शाह पहला 8=1394 नासिरुदीन शाह दुसरा 9=1395 नसरत शाह 10=1399 नासिरुदीन महमद शाह दूसरा दुबारा सता पर 11=1413 दोलतशाह 141...

एमपीएससी _ विविध कायदे.

🔹विविध कायदे PSI-STI-ASO मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त मटेरियल शेअर करत आहोत. यामध्ये PSI-STI-ASO मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त असे विविध कायदे आहेत. ज्या त्या एक्साम नुसार आपण या कायद्याचा अभ्यास करू शकता.  अधिक माहितीसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल @MPSCmaterial जॉईन करायला विसरू नका. Https://t.me/MPSCmaterial ● केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 🔗 https://t.me/MPSCMaterial/1774 ● माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 (यशदाचे पुस्तक - संक्षिप्त स्वरूपात) 🔗 https://t.me/MPSCMaterial/1775 ● माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 (यशदाचे पुस्तक - विस्तृत स्वरूपात) 🔗 https://t.me/MPSCMaterial/1778 ● महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, 2015 🔗 https://t.me/MPSCMaterial/1780 ● कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2005 🔗 https://t.me/MPSCMaterial/1782 ● अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती( अत्याचार प्रतिबंध) अधिनियम- 1989 🔗 https://t.me/MPSCMaterial/1783 ● नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 🔗 https://t.me/MPSCMaterial/1784 ● मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 🔗 https://t.me/MPSCMaterial/1785 ● हुंडा प्रतिबंध...

श्रावण

सध्या श्रावण मास सुरु आहे. सर्वांचीच मने हर्षोउल्हासित करणारा हा महिना अनेक कवितांमधून, गीतांमधून अनेक कविंनी रंगवलेला आहे  . . .           ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा           पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा हे गाणं कोणी आणि कधी लिहिलंय कोणास ठाऊक? लहानपणी ज्यानं हे पाऊसगाणं म्हटलं नसेल तो लहानच नसावा कधी. एक `पैसा’ हे नाणं चलनातून कधीच बाद झालंय. पण आजची कॉन्व्हेंटमधली मुलंही हे गाणं म्हणत पहिल्या पावसात भिजतात. गुगलवर सर्च मारला तरी हे गाणं वाचायला मिळतं. गाणं एवढं साधं, सरळ सोपं, की भर्रकन् पाठ व्हावं. एकही जोडशब्द नाही की बोजड शब्द नाही. लहानपणच्या पावसाचं दुसरं एक गाणं…          नाच रे मोरा,          आंब्याच्या बनात,          नाच रे मोरा नाच… हे तर कविता म्हणून बालभारतीच्या पुस्तकातही होतं. बाहेर पाऊस सुरू झाला की त्याच्या लयीत सगळ्या वर्गानं हे गाणं एका सुरात म्हणायचं. मोराचं पहिलं दर्शन झालं होतं ते बालभारतीच्या पुस्तकातच. भरपूर पाऊस यावा अन् शाळेल...

राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंती - 26 जुन 2020

आज दि. 26 जुन रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांची जयंती. शाहू महाराजांचा हा जन्म दिवस ' सामाजिक न्याय दिवस' म्हणून साजरा केला जातो. कार्य -  शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले . स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी ई. स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. ई. स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी निपाणी येथे ' डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वदोक्त प्रकरण शाहू महाराजांचा काळात झाला. राजर्षी शाहूंनी डॉ. आंबेडकर यांना त्यांच्या शिक्षणासाठी, मूकनायक वृत्तपत्रसाठी सहकार्य केले. तसेच चित्रकार आबालाल रहिमा...

जेव्हा माणूस जागा होतो - गोदावरी परुळेकर

उपेक्षितांचं जग दाखवणारी पुस्तकं : *जेव्हा माणूस जागा होतो : कॉ.गोदावरी परुळेकर*  --------------------------------------                              तरुण मुला-मुलींना वंचित, शोषित समूहाविषयी माहिती व्हावी, सामाजिक भान विकसित व्हावं यासाठी मराठीतील उपेक्षितांच्या जगण्यावरच्या  पुस्तकांचा परिचय देणारी ५० पुस्तकांची व्हिडिओ परिचय मालिका सुरू केली आहे. त्यात आज कॉ. *गोदावरी परुळेकर* यांच्या *जेव्हा माणूस जागा होतो*( (मौज प्रकाशन) यांच्या पुस्तकाचा परिचय आहे. ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासींवर होणारे अत्याचार आणि त्याविरोधात आदिवासींना संघटित करून कम्युनिस्ट कार्यकर्त्यानी जो अथक लढा देऊन आदिवासींमध्ये जे आत्मभान जागे केले त्या लढ्याची ही कहाणी आहे.सोबतच्या लिंक मध्ये जरूर ऐका.

माणस - अनिल अवचट

उपेक्षितांचं जग दाखवणारी पुस्तकं : *माणसं (अनिल अवचट)*  --------------------------------------                              तरुण मुला-मुलींना वंचित, शोषित समूहाविषयी माहिती व्हावी, सामाजिक भान विकसित व्हावं यासाठी मराठीतील उपेक्षितांच्या जगण्यावरच्या  पुस्तकांचा परिचय देणारी ५० पुस्तकांची व्हिडिओ परिचय मालिका सुरू केली आहे. त्यात आज प्रसिद्ध लेखक' *अनिल अवचट यांच्या माणसं (मौज प्रकाशन)* या पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. स्थलांतर करणारे मजूर, झोपडपट्टीत राहणारी माणसं, भटके विमुक्त, अमानुष शोषण होणारे हमाल,निपाणीचे तंबाखू कामगार यांच्यासोबत राहून लिहिलेले हे रिपोर्ताज आहेत.सोबतच्या लिंक मध्ये जरूर ऐका.      https://youtu.be/up34bQ93_pw  

दुष्काळ आवडे सर्वांना - पुस्तक परिचय

पुस्तक परिचय : दुष्काळ आवडे सर्वांना  -----------------------------------------------------                                तरुण मुला-मुलींना वंचित, शोषित समूहाविषयी माहिती व्हावी, सामाजिक भान विकसित व्हावं यासाठी मराठीतील सामाजिक विषयांवरच्या पुस्तकांचा परिचय देणारी ५० पुस्तकांची व्हिडिओ मालिका सुरू केली आहे. त्यात आज प्रसिद्ध पत्रकार पी साईनाथ यांच्या 'दुष्काळ आवडे सर्वांना'(अक्षर प्रकाशन) या पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. 13 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या भारतातील या दर्जेदार पुस्तकाविषयीची माहिती सोबतच्या लिंक मध्ये जरूर ऐका.     https://youtu.be/yjV0LQ-BvwQ       

चरित्रकथा प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल

दिनांक १५ मे २० रोजी mppmblibrary.blogspot.com येथे ओळख करून दिलेल्या पुस्तकांवर चरित्र कथा प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. ह्यास्पर्धेत  महाराष्ट्रातील विविध भागांतून नांदेड, बुलढाणा, सातारा अशा भागातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे - १) प्रथम क्रमांक - भावना मारू मथुबाई गरवारे महाविद्यालय सांगली २) प्राजक्ता आनंद मिठारी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ३) प्रांजली सुर्यवंशी के आय टी कॉलेज कोल्हापूर विजेत्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 

बलुतं - दया पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीचे महत्त्व अधोरेखित करणारे दया पवारांचे बलुतं हे पुस्तक मराठी साहित्यात महत्वाचे मानले जाते. दया पवारांना वाटतं त्याप्रमाणे यांचं जगणं म्हणजे एक कोंडवाडा आहे. समाजातील ज्या घटकाला वर्षानुवर्षे  गावकुसा बाहेर ढकलले गेले त्या घटकातील माणसांची एका विशिष्ट कालखंडातील जगण्याची धडपड बलुतं या आत्मकथानकातून अतिशय प्रांजळपणे व्यक्त झाली आहे. अत्यंत अन्यायकारक समाज व्यवस्थेमुळे वाट्याला आलेलं दुःखाचं बलुतं कुणाला सांगू नये इतकं दाहक आहे. हे दुःख मानवनिर्मित आहे. सदर आत्मकथेतील कालखंड १९४० च्या सुमाराचा आहे. बाबासाहेबांनी जागृती सुरू केली तो हा काळ. आत्मकथन म्हणजे एकप्रकारचा आरसाच आहे. फार काळापासुन भारतीय समाज हा जात, वर्ग व लिंगभेदाने बरबटलेला असून त्यात भांडवलशाहिने जणू भरच टाकलीय; अशा काळात मुंबईसारख्या शहरांमध्ये राहणं सामान्य माणसासाठी अगदी दुरापास्त होऊन बसले आहे. ह्या सगळ्या खटाटोपींध्ये आपलं अस्तित्त्व टिकविण्यासाठी कोणकोणत्या दिव्यांचा सामना करावा लागतो याचं यथार्थ चित्रण  बलुतं मधून बघायला मिळतं. बलुतं हे आत्मचरित्र दया पवार...

स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक

1936 साली  प्रथम प्रकाशित झालेले स्मृतिचित्रे झालेले हे पुस्तक आज 85  वर्षे झाली तरी वाचकांना तितकेच भावते आहे. लक्ष्मीबाईंनी गप्पा मारताना हकीकती सांगाव्यात तशी ही स्मृतिचित्रे रेखाटली आहे. लक्ष्मीबाईचे लहानपणीचे नाव मनकर्णिका. त्यांचे 11 व्याा वर्षीच लग्न झाले व त्यांचे नाव मनकर्णिका गोखले चे लक्ष्मीबाई नारायण टिळक झाले. यात लक्ष्मीबाई आपल्या पतीच्या आठवणी सांगताना कायम त्यांचा उल्लेख ' टिळक' असा करतात. त्यांनी सांगितलेल्या आठवणीत लहानसहान प्रसंगातील नाट्य पकडण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. पुढे आपल्या मुलाच्या सांगण्यावरून त्या लिहू लागतात. आठवणी लिहू लागल्यावर त्या सुचेल तसं ते कधी खडूने, तर कधी कोळशाने जमिनीवर लिहून काढीत त्या बोलत तशाच लिहीत. हा लेखन प्रकार त्या काळात वेगळाच होता. अखेर १९३४ साली स्मृतिचित्रेचा पहिला भाग प्रसिद्ध झाला.  लग्नानंतर पितृसत्ताक  जीवन पद्धती काळात आजची तरुण पिढी कल्पना देखील करू शकणार नाही इतकी विचित्र. स्त्रियांना साधी लुगडी घ्यायची तरी घरातील कर्त्या पुरुषावर अवलंबून रहावे लागे. लक्ष्मीबाईच्या ललाटी देखील सुरुवातीला...