1936 साली प्रथम प्रकाशित झालेले स्मृतिचित्रे झालेले हे पुस्तक आज 85 वर्षे झाली तरी वाचकांना तितकेच भावते आहे. लक्ष्मीबाईंनी गप्पा मारताना हकीकती सांगाव्यात तशी ही स्मृतिचित्रे रेखाटली आहे. लक्ष्मीबाईचे लहानपणीचे नाव मनकर्णिका. त्यांचे 11 व्याा वर्षीच लग्न झाले व त्यांचे नाव मनकर्णिका गोखले चे लक्ष्मीबाई नारायण टिळक झाले. यात लक्ष्मीबाई आपल्या पतीच्या आठवणी सांगताना कायम त्यांचा उल्लेख ' टिळक' असा करतात. त्यांनी सांगितलेल्या आठवणीत लहानसहान प्रसंगातील नाट्य पकडण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. पुढे आपल्या मुलाच्या सांगण्यावरून त्या लिहू लागतात. आठवणी लिहू लागल्यावर त्या सुचेल तसं ते कधी खडूने, तर कधी कोळशाने जमिनीवर लिहून काढीत त्या बोलत तशाच लिहीत. हा लेखन प्रकार त्या काळात वेगळाच होता. अखेर १९३४ साली स्मृतिचित्रेचा पहिला भाग प्रसिद्ध झाला.
लग्नानंतर पितृसत्ताक जीवन पद्धती काळात आजची तरुण पिढी कल्पना देखील करू शकणार नाही इतकी विचित्र. स्त्रियांना साधी लुगडी घ्यायची तरी घरातील कर्त्या पुरुषावर अवलंबून रहावे लागे. लक्ष्मीबाईच्या ललाटी देखील सुरुवातीला तेच होते. सासरे स्वभावाने तिरपागडे त्यात टिळक मध्येच गायब होत. एका ठिकाणी शिक्षकाची नोकरी करत तिथे एका योग्याच्या नादी लागले. भर दिवसा रानावनात जावून ध्यान करत तर कधी नदीत बसून गुरुमंत्र म्हणत. टिळक लक्ष्मीबाईंनी शिकावे म्हणून पुस्तके घेवून जातात व शिकवताना लक्ष्मी बाई हसतात तर सगळी पुस्तके फाडून जाळून टाकतात असे टिळक रागीट.
राजनांदगाव येथील दोन वर्षात टिळकांच्या मनःस्थितीत बराच बदल होतो ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित व तो धर्म स्वीकारतात. मात्र लक्ष्मीबाई हिंदूच राहतात. पुढचा संसाररथ आता दोन चाके भिन्न विचारधारांची असतात. त्या घराला आता भिन्न प्रवृत्तीच्या माणसांचे अनेक दाहक अनुभव येतात हा सारा भाग अतिशय प्रांजळपणे पुस्तकात आलेला आहे. अत्यंत कठीण आणि परीक्षेचा काळ! याकाळाशी त्यांनी दिलेली झुंज वाचकाला अंतर्मुख करते. कथानकाच्या ओघात बालकवींच्या आठवणी, पतीचा मृत्यू, दुष्काळातील समाजसेवा, कराचीतील वास्तव्य यागोष्टी अतिशय प्रभावीपणे येतात.
आचार्य अत्रे यांनी या पुस्तकाची तुलना महात्मा गांधी यांच्या सत्याचे प्रयोग या पुस्तकांशी केली. ते म्हणतात " महात्मा गांधीनी सत्याचे प्रयोग लिहताना जो मोकळेपणा आणि निर्भयता दाखवली, तीच गोष्ट स्मृतिचित्रेमध्ये आढळते. आज एवढ्या वर्षानंतर देखील वाचकांचे या पुस्तकावर निस्सीम प्रेम आहे.
Nice book
ReplyDeleteNice book
ReplyDeleteVery nice book
ReplyDeleteअतिशय निर्व्याज आणि आपुलकीने,प्रांजळपणे लिहिलेले हे चरित्र आहे. साधी,सोपी,घरगुती वळणाची,अनलंकृत मराठी भाषा,ना. वा
ReplyDeleteटिळकांसारखा तिरसट व विचित्र स्वभावाचा नवरा,सोवळे-ओवळे.... तरीही जीवनावर प्रेम करणाऱ्या लक्ष्मीबाईचे चरित्र म्हणजे खरोखरच आठवणीतील सुखद ठेवा आहे.