आज दि. 26 जुन रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांची जयंती. शाहू महाराजांचा हा जन्म दिवस ' सामाजिक न्याय दिवस' म्हणून साजरा केला जातो.
कार्य -
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले . स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी ई. स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. ई. स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी निपाणी येथे ' डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वदोक्त प्रकरण शाहू महाराजांचा काळात झाला.
राजर्षी शाहूंनी डॉ. आंबेडकर यांना त्यांच्या शिक्षणासाठी, मूकनायक वृत्तपत्रसाठी सहकार्य केले. तसेच चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देवून प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना ' राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था, व्यापार पेठ , राधानगरी धरण उभारणी, शेतकऱ्यांना कर्ज उभारणी करून देवून कृषिविकास कडे लक्ष पुरवले. त्यांना लोकांविषयी कणव होती. त्यांनी हजेरी पद्धत बंद केली. जाती जमातीच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारी पासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी रखवालदार नेमले. वणवण फिरणाऱ्या लोकांना राहण्याची सोय झाली व त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येवू लागले.राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला, कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन दिले.
शाहू महाराजां वरील विविध प्रकाशित साहित्य:
१)Rajarshi Shahu Chhatrapati: A Socially revolutionary King
२)शाहू महाराजांची चरित्रे- माधवराव बागल
३) बी. ए. लठ्ठे यांनी लिहिलेले इंग्रजीतील पहिले चरित्र राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य - रा. ना. चव्हाण
५) राजर्षी शाहू छत्रपती- डॉ. रमेश जाधव
६) कोल्हापूरचे शाहू छत्रपती चरित्र व कार्य -एकनाथ घोरपडे
७) राजर्षी शाहू कार्य व काळ- रा. ना. चव्हाण
८) समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज- डॉ. सुवर्णा नाईक
Comments
Post a Comment