डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीचे महत्त्व अधोरेखित करणारे दया पवारांचे बलुतं हे पुस्तक मराठी साहित्यात महत्वाचे मानले जाते. दया पवारांना वाटतं त्याप्रमाणे यांचं जगणं म्हणजे एक कोंडवाडा आहे. समाजातील ज्या घटकाला वर्षानुवर्षे गावकुसा बाहेर ढकलले गेले त्या घटकातील माणसांची एका विशिष्ट कालखंडातील जगण्याची धडपड बलुतं या आत्मकथानकातून अतिशय प्रांजळपणे व्यक्त झाली आहे. अत्यंत अन्यायकारक समाज व्यवस्थेमुळे वाट्याला आलेलं दुःखाचं बलुतं कुणाला सांगू नये इतकं दाहक आहे. हे दुःख मानवनिर्मित आहे. सदर आत्मकथेतील कालखंड १९४० च्या सुमाराचा आहे. बाबासाहेबांनी जागृती सुरू केली तो हा काळ. आत्मकथन म्हणजे एकप्रकारचा आरसाच आहे. फार काळापासुन भारतीय समाज हा जात, वर्ग व लिंगभेदाने बरबटलेला असून त्यात भांडवलशाहिने जणू भरच टाकलीय; अशा काळात मुंबईसारख्या शहरांमध्ये राहणं सामान्य माणसासाठी अगदी दुरापास्त होऊन बसले आहे. ह्या सगळ्या खटाटोपींध्ये आपलं अस्तित्त्व टिकविण्यासाठी कोणकोणत्या दिव्यांचा सामना करावा लागतो याचं यथार्थ चित्रण बलुतंमधून बघायला मिळतं. बलुतं हे आत्मचरित्र दया पवार याचे आहे. हे मराठी साहित्यातील पहिले आत्मचरित्र आहे. दलित समाजातील हळुहळु होणारे बदल तसेच मुंबई शहर बद्दलची माहिती देखील आलेली आहे. स्वतः ला कमी लेखणाऱ्या या मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर दगडू मारुती पवारांचं बालपण कधी खेड्यात तर कधी शहरात गेले . दगडूचे वडील दादा मुंबईला सुक्या गोदीत कामाला होते. मुंबईला कावाखाना इथे ते राहत. एका बाजूला चोरबजार तर दुसऱ्या बाजूला कामाठीपुरा. नागपाड्याच्या म्यूनसिपल शाळेत दगडूच शिक्षणझालेलं.
लेखकाची आई कागद गोळा करायची. पगार झाला की वडील गायब व्हायचे. वडिलांची तब्ब्येत खालावली त्यामुळे नोकरी सुटते व परत गावी येतात. शाळेत शिक्षकांकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी संदर्भात माहिती मिळते. इकडे वडिलांचं आजारपण वाढत जातं. अंगार, धुपारे, मांत्रिक उपचार सुरू असतात मात्र दवाखान्यात दाखल करण्यात येत नाही तशी मानसिकताच नसते. त्यामुळे वडिलांचे निधन होतो . एखाद्या समाजातील लोकं केवळ अज्ञानामुळे असे हाल होवून मरतात ही गोष्ट वाचकाला अस्वस्थं करून जाते. आत्मकथनात वर्णन केलेला महारवाडा बाबासाहेबांची सामाजिक चळवळ सुरू झाली त्याकाळातला आहे. हा महारवाडा काळजावर जखम व्हावी असा आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची आई कंबर कसते. बाबासाहेबांचे विचार तिने ऐकलेले असतात. कुठेतरी शिक्षणाचे महत्त्व तिला जाणवते . ती लेखकाला शिक्षणासाठी तालुक्याला पाठवते. शिक्षणामुळे दगडूच्या आचारात, विचारात फरक पडतो. पुढे नोकरी करतात. आपल्या आईने मार्केट मध्ये कागद वेचू नये त्यांनी आपली अप्रतिष्ठा होते असे त्यांना वाटते. लेखकाचे म्हणणे कितीही खरे असले तरी आईने ऐकायला तर हवे? आई मुलाचा हा संघर्ष निव्वळ दोन पिढ्यांतील नाही तर सामाजिक स्तरातला देखील आहे.
आत्मकथनातून येणाऱ्या निरनिराळ्या व्यक्तीरेखातून समाजाच्या स्तरातला सामाजिक आणि सांस्कृतिक फरक लक्षात येतो. या बदलामुळे सुशिक्षित झाल्यावर लेखकाची होणारी भावनिक कुचंबणा वाचकाला व्यथित करते.या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली.
खुपच छान
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteNice story
ReplyDeleteNice book
ReplyDeleteNice book
DeleteNice book
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice book
ReplyDeleteNice book
ReplyDeleteNice book
ReplyDeleteदलित साहित्यातील व्यथा वेदनेचा पहिला हुंकार म्हणजे बलुतं हे आत्मकथन आहे.
ReplyDeleteMast
ReplyDeleteKhup chan book ah
ReplyDeleteखुप छान आहे
ReplyDeleteMst
ReplyDelete