Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

क-हेचें पाणी - प्र. के. अत्रे

प्र. के. अत्रे  हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व . शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता, उत्कृष्ट वक्ता प्रसिद्ध होते. त्यांचे पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे. उर्फ केशवकुमार नावाने ते लिहत असत. त्यांचे आत्मचरित्र क-हेचें पाणी. याचे पाच खंडात त्यांनी विस्तृत स्वरूपात जीवन प्रवास वर्णन केला आहे झेंडूची फुले' विडंबन काव्य, 'गुद्दे आणि मुद्दे', मन हेलावून टाकणारे त्यांचे समधीवरील अश्रू आणि मनाला हुंदके घालायला लावणारी ' हुंदके' हे ग्रंथ मनात घर करून जातात. हिम्मत काय असते हे आचार्य अत्रे यांचे क-हेचें  पाणी पाच खंडातील २५०१ पृष्टांचे आत्मचरित्र वाचले म्हणजे समजते. समुद्रात अनेक नावाडी नाव सोडून असावेत आणि एकदम अचानक तुफान यावे, तुफान पाहून सर्वच नावाडी माघारी फिरतात, परंतु या तुफानालाही न घाबरता एका नावड्याने आपली नाव तूफानातून पुढेच घेवून जावी आणि किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना वाटावे आता या नावेला कधीही जलसमाधी मिळते की काय? दुसऱ्याच क्षणी नावाड्याने नाव व्यवस्थित तूफानातून बाहेर काढावी आणि किनाऱ्यावरील लोकांनी सांगावे बाबा वळव रे आता माघारी नाव...

गरुडझेप - भरत आंधळे

 यशस्वी कहाणी मागे वेदनादायी भूतकाळ असतो.... प्रत्येक वेदनादायक सुरुवातीचा अंत एक यशस्वी कहाणी असते असे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ' अग्निपंख' आत्मकथेच्या प्रस्तावनेत म्हणतात. जीवनाच्या विविध क्षेत्रांत यशस्वी झालेले अनेक व्यक्तिमत्वे आपण पाहतो . अशा व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्यांना जाणून घेण्याची एक तीव्र इच्छा निर्माण होते. आयुष्यात यश मिळवत असताना त्या व्यक्तीने केलेले कष्ट, सहन केलेली उपासमार हे जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा यावाक्याची प्रचिती येते. आपल्या स्वप्नांवर विश्वास असेल तर स्वप्न वास्तवात साकारू शकतो. अशीच एक ध्येयवेड्या स्वप्नाची आत्मकथा या पुस्तकातून आपण अनुभवतो. अपयश यशाची पहिली पायरी आहे असे आपण म्हणतो परंतु अप यशाच्या अनेक पायऱ चढून गेल्यावर यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या भरत आंधळे यांचा प्रवास स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वांनाच जीवन प्रेरणा देणारा आहे. गरुडझेप हे पुस्तक स्टडी सर्कलने प्रकाशित केले आहे दुसरी आवृत्ती २०१२ मध्ये प्रकाशित असून किँमत १०० रू. आहे.या पुस्तकाची अक्षर मांडणी सुबक, वाचनीय स्वरूपाची अस...

आमचा बाप आन आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव

प्रसिद्ध अभिनेता निळू फुले यांनी ज्या पुस्तकाबददल अशी प्रतिक्रिया दिली - " साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि नरेंद्र जाधवांनी महाराष्ट्राला आदर्श बाप!" ते पुस्तक म्हणजे आमचा बाप आणि आम्ही. डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र. या पुस्तकाच्या प्रकाशन दिवशीच १००० प्रतींची पहिली आवृत्ती संपली.  २३ जानेवारी १९९३ रोजी ग्रंथाली प्रकाशन ने प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या १९९  मराठीआवृत्या निघालेल्या आहेत आणि मराठी साहित्याच्या इतिहासात सर्वात मोठ्या विक्रीचे पुस्तक म्हणून नोंद झालेली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी, तमिळ, फ्रेंच अशा एकूण २० देशी विदेशी  भाषांमध्ये अनुवादित झालेले हे पुस्तक. वीस वर्षांत सहा लाख प्रती विकल्या जाणारे हे पुस्तक  आजही बेस्ट सेलर म्हणून आहे. मराठी पुस्तकात प्रसन्न शैली व आशावादी जीवनदृष्टी दिसते. साहित्य अकादमी पुरस्कार ( पंजाबी भाषा) मिळालेला आहे.  डॉ. नरेंद्र यांचे बालपण वडाळ्याच्या वस्तीत गेले त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी एस्सी करून १९८३ मध्ये अमेरिकेतील विद्याीठामार्फत डॉक्टरेट पदवी व सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्ह...

सत्याचे प्रयोग- मोहनदास करमचंद गांधी

मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी यांचे आत्मकथन सत्याचे प्रयोग या पुस्तकाची ओळख आज आपण करून घेणार आहे. वरदा प्रकाशन ने प्रकाशित केले आहे हे पुस्तक. ह्या पुस्तकातील भाषा सरळ, बाळबोध वळणाची असली तरी अत्यंत आशयघन आहे.या पुस्तकाची गणना २० व्या शतकात महत्वाच्या पुस्तकात केली गेलेली आहे. महात्मा गांधी यांनी जीवनभर कशी वाटचाल केली याचा मागोवा यात घेतला आहे.मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी भाषांमध्ये हे पुस्तक उपलब्ध असून जगातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेले हे पुस्तक आहे. यात गांधीजींनी त्यांच्या लहानणापासून ते १९२१ पर्यंतचे आयुष्य रेखाटलेले आहे.या पुस्तकाची प्रस्तावना स्वतः गांधीजींनी लिहली असून त्यात त्यांनी सांगितले आहे की येरवडा कारागृहातील सहकारी कैदी जेरमदास यांच्या आग्रहामुळे त्यांनी हे आत्मचरित्र लिहिले. त्यांनी बालपणात वाचलेली दोन पुस्तके त्यांचा परिणाम खूप होता असे सांगितले सत्यवान हरिशचंद्र या पुस्तकाचा प्रभाव तर एवढा होता की ते स्वतः ला हरिशचंद्र समजून अनेकवेळा कल्परंजन करीत. तसेच गीतेचे ७०० श्लोक कसे दृढनिश्चयाने पाठ केले याचे ही  वर्णन केले आहे. गांधीजींचे ...

जगाच्या पाठीवर - सुधीर फडके

सुप्रसिद्ध संगीतकार  कै.सुधीर फडके म्हणजे बाबूजींचे अपुरे आत्मकथन. आपल्याला यशस्वी व्यक्तींना मिळालेले यश दिसते परंतु त्यापाठीमागे त्यांनी केलेले कष्ट दिसत नाही. सुधीर फडके. नावारूपाला येण्याआधी काय संघर्ष केला ते हे पुस्तक वाचल्यावर कळते. त्यांना उत्तर आयुष्यात मिळालेले यश अपयश  त्यावर मात करणारी त्यांची जिद्द याचे प्रभावी दर्शन घडवणारे हे पुस्तक सुद्धा लोकप्रियतेचे  उच्चांक प्रस्थापित करणारे ठरले आहे.यांचे मूळ नाव रवींद्र विनायक फडके. भटकत आणि कंगाल अवस्थेतही संगीत साधना करीत राहिलेला एका कलंदर कलावंताचे विलक्षण पारदर्शी आत्मकथन आहे. हे आत्मचरित्र संपूर्ण नाही. या पुस्तकात ललिता फडके यांनी सांगितलेल्या अनेक आठवणी असंख्य दुर्मिळ छायाचित्रे यांच्या समावेशामुळे पुस्तकाच्या मौलिकतेत भर पडली आहे. संगीताशी कधीच संबंध आला नाही तरी देखील बाबूजींनी मरण यातना भोगल्या व संगीताची नाळ कायम जोडलेली ठेवली.  घरच्या गरिबीमुळे नातेवाईकांच्या , मित्रांच्या आधारावर जगायला लावलं. उपासमार सहन करावी लागली, भूक काय असते तिची किँमत काय असते, माणसाला वेड लागते म्हणजे काय होते कध...

कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाण हे भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. महाराष्ट्रातील एका लहानशा खेड्यात व अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले त्यांनी आपल्या कर्तृतने महाराष्ट्राच्या व भारताच्या शासनामध्ये अनेक उच्चपदस्थ स्थान भूषविली.. महाराष्ट्र राज्याचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री भूषविली. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील १९१२ ते १९४६  पर्यंतच्या कालखंडाचा आढावा घेणार कृष्णाकाठ हे आत्मचरित्र. ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९८४ रोजी तर दुसरी आवृत्ती यशवंतराव चव्हाण यांच्या जनमशताब्दी वर्षानिमित्त रोहन प्रकाशन ने प्रकाशित केली. देवराश्ट्रे हे त्यांचे जन्मगाव ते सातारा जिल्ह्याच्या एका टोकाशी वसलेले आहे.त्या गावच्या रम्य आठवणी पासून या आत्मचरित्राला सुरुवात होते. सार्वजनिक आयुष्यात यशवंतराव चव्हाण कसे घडत गेले याची देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधी पर्यंतची कहाणी आहे. यशवंत राव ४ वर्षाचे असताना त्यांचे वडील प्लेगने वारले. पुढील जबाबदारी आईने पेलली. याग्रंथात यशवंतराव आपल्या आईबद्दल म्हणतात" माझी आई शाळेत शिकली नव्हती, पण ती शिक्षणाचे मोल मनोमन जाणंत होती. आमच्या घरची ...

एक होता कार्व्हर- अनुवाद वीणा गवाणकर

प्रिय वाचकांनो आज आपण ' एक होता कार्व्हर' या चरित्र पुस्तकाची ओळख घेणार आहोत.वीणा गवाणकर यांनी अनुवादित केलेली कार्व्हर यांची जीवनकहाणी. प्रकाशक दिलीप माजगावकर राजहंस प्रकाशन, किँमत १५० रू. अमेरिकेतील मिझुरी राज्यात डायमंड ग्रोव्ह वाड्यावर मोझेस कार्व्हर आपल्या कुटुंबासह आणि मेरी नावाच्या गुलाम निग्रो स्त्री तिच्या दोन मुलांसह राहत होते.१८६०- ६२ दरम्यान मेरीला तिच्या एका मुलासोबत एका टोळीने रातोरात पळवून  नेली. मोझेस यांनी घोड्यांच्या बदल्यात सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु फक्त २ महिन्यांचा मुलगा मिळाला.निग्रोना त्याकाळी अमेरिकेत गुलाम म्हणून वागवले जायचे. मोझेस कार्व्हर सोबत निसर्गात हे अनाथ पोर वाढत होते. लहानणापासूनच रानावनात झाड झुडपे, पक्षांची पिल्ली, मासे यांच्या सोबतच मेरीचे पोर वाढत होते. या मेरीच्या पोराची प्रामाणिक व विनम्र वृत्ती पाहून कार्व्हर कुटुंबात त्याचं नामकरण केलं - जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. निसर्ग शाळेत शिकत असताना वनस्पतींशी जास्त परिचय होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत शिक्षण घेण्यासाठी स्वयंपाक, लाँड्री, बागकाम, गिरणीत काम, सरपण फोडून देण...

माय लाईफ ( An Elestreted Biography)_ लेखक डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम

भारताचे ११ वे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मरणोत्तर प्रसिद्ध झालेले चरित्र. रूपा पब्लिकेशन ने प्रकाशित केलेले या पुस्तकाची पृष्ठे ११९ असून किंमत रू २९५ एवढी आहे. अग्निपंख हे पुस्तक आपल्या सर्वांना माहीत असेलच. माय लाईफ हे त्यांचे चरित्र पुस्तकाची छपाई आकर्षक असून त्यात भरपूर चित्रे आहेत.या पुस्तकात कलाम यांनी अनेक महत्तवपूर्ण घटनांचा उल्लेख केला आहे. ज्यावेळेस SLV ३ यशस्वी उड्डाण झाले त्यानंतर इंदिराजीनी त्यांना भेटावयास बोलावले तेव्हा त्यांनी आपले गुरू सतीश धवन यांना कोणते कपडे घालायचे  असा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले कोणतेही कपडे घाल. तुला मिळालेले यश हे महत्वाचे आहे कपडे नाहीत.हा उपदेश त्यांनी  आयुष्यभर लक्षात ठेवला. केव्हाही त्यांचे वकपडे म्हणजे जास्तीत जास्त तीन सुट व ५/६ शर्ट . डॉ. कलाम हे सदैव तरुणांना प्रेरणा देत. म्हणून आजही अनेक तरुणांचे ते रोल मॉडेल आहेत.भारतातील जनतेच्या मनात आजही त्यांच्याप्रती आदर आहे. जनतेचे ते सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती होते.. संपूर्ण आयुष्य शास्त्रीय संशोधनात घालवणारे त्यांना जेव्हा कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर देण्य...

जागतिक ग्रंथ दिन

नमस्कार प्रिय वाचकांनो मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव च्या ग्रंथालय विभागामार्फत आज जागतिक ग्रंथ दिनाचे औचित्य साधून हा ब्लॉग तयार करण्यात आलेला आहे.  आपल्या संस्क्रुतीत ग्रंथांची प्रदीर्घ परंपरा आहे.  आधुनिकिकरणामुळे पुस्तके इंटरनेट आणि मोबाईल वर सहज उपलब्ध होत आहेत. तंत्रज्ञान मुळे वाचन प्रेम कमी झाले नाही तर फक्त माध्यम बदलले आहेत. वाचनसंस्कृती ही प्रगल्भ होत असून वाचना सोबत आता वाचक स्वतः ला व्यक्त करू लागली आहेत. सोशल मीडियाचां वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे त्याचाच विचार करून ब्लॉग या माध्यमाचा वापर करून आपल्याशी संवाद साधणार आहे. जागतिक ग्रंथ दिंन _ २३ एप्रिल  विल्यम शेकसपिअर च्या वाडमयाने जगभर गेली चार शतकांपेक्षा जास्त वर्षे गारूड केलेले आहे. २३ एप्रिल १५६४ रोजी जन्मलेले v २३ एप्रिल १६१६ रोजी मृत्युदिन शेक्सपिअरचा आहे. छपाईचा शोध लागल्यानंतर जगातील सर्वाधिक छापला गेलेला , वाचला गेलेला, चर्चा झालेला आपल्या साहित्यावर लिहिले गेलेल्या, अनुवाद झालेला हा सर्वात लोकप्रिय लेखक आहे. तसेच त्यांच्या लेखनावर आधारित सर्वात जास्त साहित्...