Skip to main content

कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाण हे भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. महाराष्ट्रातील एका लहानशा खेड्यात व अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले त्यांनी आपल्या कर्तृतने महाराष्ट्राच्या व भारताच्या शासनामध्ये अनेक उच्चपदस्थ स्थान भूषविली.. महाराष्ट्र राज्याचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री भूषविली. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील १९१२ ते १९४६  पर्यंतच्या कालखंडाचा आढावा घेणार कृष्णाकाठ हे आत्मचरित्र. ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९८४ रोजी तर दुसरी आवृत्ती यशवंतराव चव्हाण यांच्या जनमशताब्दी वर्षानिमित्त रोहन प्रकाशन ने प्रकाशित केली.
देवराश्ट्रे हे त्यांचे जन्मगाव ते सातारा जिल्ह्याच्या एका टोकाशी वसलेले आहे.त्या गावच्या रम्य आठवणी पासून या आत्मचरित्राला सुरुवात होते. सार्वजनिक आयुष्यात यशवंतराव चव्हाण कसे घडत गेले याची देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधी पर्यंतची कहाणी आहे. यशवंत राव ४ वर्षाचे असताना त्यांचे वडील प्लेगने वारले. पुढील जबाबदारी आईने पेलली. याग्रंथात यशवंतराव आपल्या आईबद्दल म्हणतात" माझी आई शाळेत शिकली नव्हती, पण ती शिक्षणाचे मोल मनोमन जाणंत होती. आमच्या घरची परिस्थिती गरिबीची असली तरी संस्कारांनी आई श्रीमंत होती. ही श्रीमंती आम्हा मुलांपर्यंत पोचविण्याचा तिचा सततचा प्रयत्न होता. जडण घडण या पहिल्या प्रकरणात शाळेतील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला तुला मोठे झाल्यावर काय व्हावेसे वाटते हे लिहायला सांगितले तेव्हा यशवंतराव मी यशवंतराव चव्हाण होणार असे लिहतात या प्रसंगातून त्यांच्यात प्रचंड जिद्द, आत्मविशवास दिसून येतो.
या पुस्तकात त्यांनी आपल्या जन्मतारखे बद्दल तपशील काहीसा गमतीशीर आहे. यशवंतराव चव्हाण म्हणतात माझा जन्म देवराष्ट्रे येथे १२ मार्च १९१३ रोजी झाला . शाळेचे सर्टिफिकेट एवढाच त्याचा पुरावा आहे. मी माझ्या आईचे पाचवे अपत्य असल्याने माझा जन्म तारखेची नोंद ठेवण्याची काळजी घेतली नाही. काही मंडळी तुमची निश्चित जन्म तारीख सांगा म्हणतात तेव्हा त्यांना मी हीच तारीख सांगतो व हीच तारीख जन्मदिवस म्हणून पाळतो आहे.
यशवंतराव चव्हाण हे कराडच्या टिळक हायस्कूल मध्ये असताना त्यांना वाचनाची गोडी अधिक वाढली तसेच सामाजिक कार्याबद्दल असलेली समज अधिक वाढली. भारताच्या स्वातंत्र्यवसांग्रमामध्ये अनेक घडामोडी घडत असताना ते त्यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी होते तो काळ लोकमान्य टिळकांचे युग संपून महात्मा गांधी यांच्या राजकारणाने सारा देश प्रभावित झालेला होता. १९२९ सालच्या अखेरीस ते काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट होवू लागले. यशवंतराव यांचा ओढा महात्मा गांधी व नेहरू यांच्या विचारसरणीकडे होता. कराड व सातारा जिल्ह्यातील राजकीय घडमोडीं व सभांच्या बातम्या पाठविण्याचे काम ते करीत. कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमांच्या चार वर्षे त्यांची  राजकीय आकलन वाढवण्यासाठी उपयोगी ठरली. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांची ओळख सातारा जिल्ह्यातील एक अग्रगण्य काँग्रेस कार्यकर्ता म्हणून झाली. निवडणुकांमध्ये कोणत्या प्रकारची समीकरणे हाताळायची ह्याचे त्यांना उत्तम भान याच काळात आले. १९३३ मध्ये कारावास घडला १९४६ मध्ये मार्च महिन्यात मुंबई विधिमंडळ झालेल्या निवणुकीत काँग्रेस उमेदवार म्हणून निवडून आले व त्यांची नेमणूक पार्लमेंट सेक्रेटरी झाले.
कृष्णाकाठ मध्ये यशवतरावांनी बाळासाहेब देसाई, बाळासाहेब खेर, वडील, आई विठाई, वडीलबंधू तसेच पत्नी वेणुताई यांच्या बद्दल आत्मीयतेने लिहलेले दिसून येते.  यशवंतरावांची विलक्षण प्रतिभा व भाषेवरील प्रभुत्व या आत्मकथनमध्ये दिसून येते .परिस्थितीचे भांडवल न करता निष्ठेने कार्यावर श्रद्धा ठेवून जिद्द, चिकाटीने प्रयत्न केले तर सामान्य माणूस कुठल्या कुठे जाऊ शकतो. यशवंतराव म्हणतात " व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत परिस्थिती, काल, व्यक्ती, समाज व त्याचबरोबर ग्रंथ देखील तेवढीच महत्वाची भूमिका बजावतात"


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल

आज 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांची जयंती. भारतीय संविधानाचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ , समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतीय  बौद्ध धर्माचे पुनरू ज्ज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. त्यांनी कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटले. डॉ. आंबेडकरांची बुध्दीमत्ता अफाट व अचाट होती. त्यांचे वाचन व लेखन फार मोठे होते. त्यांच्याकडे पंचवीस हजारांवर ग्रंथांचा व्यक्तिगत संग्रह होता. त्यांनी ग्रंथलेखन प्रामुख्याने इंग्रजीतूनच केलेले आहे. मराठी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन मराठीत दिसते. त्यांच्या सर्व ग्रंथांची मराठी भाषांतर उपलब्ध आहेत. योगदान - भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, घटनात्मक, औंद्योगिक  क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. वाचनवेड , पुस्तक प्रेम -  डॉ. आंबेडकर यांना वाचनाचे प्रचंड वेड ...

क-हेचें पाणी - प्र. के. अत्रे

प्र. के. अत्रे  हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व . शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता, उत्कृष्ट वक्ता प्रसिद्ध होते. त्यांचे पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे. उर्फ केशवकुमार नावाने ते लिहत असत. त्यांचे आत्मचरित्र क-हेचें पाणी. याचे पाच खंडात त्यांनी विस्तृत स्वरूपात जीवन प्रवास वर्णन केला आहे झेंडूची फुले' विडंबन काव्य, 'गुद्दे आणि मुद्दे', मन हेलावून टाकणारे त्यांचे समधीवरील अश्रू आणि मनाला हुंदके घालायला लावणारी ' हुंदके' हे ग्रंथ मनात घर करून जातात. हिम्मत काय असते हे आचार्य अत्रे यांचे क-हेचें  पाणी पाच खंडातील २५०१ पृष्टांचे आत्मचरित्र वाचले म्हणजे समजते. समुद्रात अनेक नावाडी नाव सोडून असावेत आणि एकदम अचानक तुफान यावे, तुफान पाहून सर्वच नावाडी माघारी फिरतात, परंतु या तुफानालाही न घाबरता एका नावड्याने आपली नाव तूफानातून पुढेच घेवून जावी आणि किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना वाटावे आता या नावेला कधीही जलसमाधी मिळते की काय? दुसऱ्याच क्षणी नावाड्याने नाव व्यवस्थित तूफानातून बाहेर काढावी आणि किनाऱ्यावरील लोकांनी सांगावे बाबा वळव रे आता माघारी नाव...

वाचन प्रेरणा दिन - 15 ऑक्टोबर 2025

  वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन  संविधान उद्देशिकेचे वाचन करून तसेच पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाची खात्री   या भित्तीपत्रकाचे मा. कुमारराव निकम यांच्या हस्ते उद्घाटन करून साजरा करण्यात आला. भारताचे महान वैज्ञानिक, मिसाईल Man म्हणून ओळखले जाणारे, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस. त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून त्यांनी दिलेला वाचल तर वाचाल या संदेशाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्म दिवस वाचनप्रेरणा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2015 पासून हा दिवस वाचन प्रेरणा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. डॉ. कलाम यांचे जीवन म्हणजे ज्ञानाची अखंड साधना होती. त्यांची गरिबीतून राष्ट्रपती पदापर्यंतची भरारी ही केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेवर व वाचनावरील निस्सिम प्रेमामुळेच शक्य झाले . पुस्तके त्यांचे मित्र होते. त्यांनी अनेक तरुणांना वाचनातून आत्मशोध व प्रगतीचा मार्ग शोधण्यासाठी प्रेरित केले. आजच्या या प्रेरणादिन कार्यक्रमा...