मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी यांचे आत्मकथन सत्याचे प्रयोग या पुस्तकाची ओळख आज आपण करून घेणार आहे. वरदा प्रकाशन ने प्रकाशित केले आहे हे पुस्तक. ह्या पुस्तकातील भाषा सरळ, बाळबोध वळणाची असली तरी अत्यंत आशयघन आहे.या पुस्तकाची गणना २० व्या शतकात महत्वाच्या पुस्तकात केली गेलेली आहे.
महात्मा गांधी यांनी जीवनभर कशी वाटचाल केली याचा मागोवा यात घेतला आहे.मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी भाषांमध्ये हे पुस्तक उपलब्ध असून जगातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेले हे पुस्तक आहे. यात गांधीजींनी त्यांच्या लहानणापासून ते १९२१ पर्यंतचे आयुष्य रेखाटलेले आहे.या पुस्तकाची प्रस्तावना स्वतः गांधीजींनी लिहली असून त्यात त्यांनी सांगितले आहे की येरवडा कारागृहातील सहकारी कैदी जेरमदास यांच्या आग्रहामुळे त्यांनी हे आत्मचरित्र लिहिले. त्यांनी बालपणात वाचलेली दोन पुस्तके त्यांचा परिणाम खूप होता असे सांगितले सत्यवान हरिशचंद्र या पुस्तकाचा प्रभाव तर एवढा होता की ते स्वतः ला हरिशचंद्र समजून अनेकवेळा कल्परंजन करीत. तसेच गीतेचे ७०० श्लोक कसे दृढनिश्चयाने पाठ केले याचे ही वर्णन केले आहे.
गांधीजींचे आयुष्य उघड्या पुस्तका सारखे होते. त्यांनी आयुष्यातील धक्कादायक गोष्टी समाजापासून लपवून ठेवल्या नाहीत त्यांनी त्या आपल्या आत्मचित्रात लिहून जगाला सांगितल्या. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना याव्यक्तीला आपण केलेली चोरी, वासना आदी गोष्टी याची वाच्यता जाहीर करताना संकोच वाटला नाही. " मी पहिली चोरी केली तेव्हा खूप रडलो आता काय करावे कळेना. शेवटी ठरवले की वडिलांना सत्य सांगायचे" असे ठरवून वडिलांना सांगणारा मोहन आपल्यातीलच एक वाटतो.
ब्रह्मचर्य हा केवळ देहाचा अलंकार नाही ती मनाची उत्तुंगता आहे हे उत्तुंगपण आपण अजुन मिळवू शकलो नाही असा संशय असल्याने स्वतः ची परीक्षा घेण्यासाठी गांधीजींनी अखेरच्या पर्वात सत्याचे प्रयोग करून पाहिले त्यासाठी त्यांनी आपली प्रतिमा पणाला लावली .आपली ही परीक्षा त्यांनी जगापासून लपविली नाही. माझे जीवन हाच माझा संदेश आहे असे सांगणाऱ्या गांधीजींचा हाच प्रामाणिक आदर्श घेत लाखो लोकांनी प्रेरणा घेतली आहे. आपलं पूर्वायुष्य सामान्य माणसांप्रमाणेच जगलेल्या सामान्य माणसा सारख्या चुका केलेल्या ह्या माणसाचा हा असामान्यत्वा पर्यंतच्या प्रवासापुढे आपण नतमस्तक होतोच आणि आपणही असे काही असामान्य करू शकतो याची न कळत स्फूर्ती मिळते.
Nice book
ReplyDeleteसत्य हा या आत्मचरित्राचा गाभा आहे. महात्मा गांधी सारखा माणूस या पृथ्वीतलावर जन्माला येऊन गेला यावर कदाचित पुढील पिढी विश्वास ठेवणार नाही असे महान शास्त्रज्ञ आइन्स्टाइन म्हणाले होते ते हे पुस्तक वाचल्यानंतर खरे वाटते.
ReplyDelete