प्रसिद्ध अभिनेता निळू फुले यांनी ज्या पुस्तकाबददल अशी प्रतिक्रिया दिली - " साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि नरेंद्र जाधवांनी महाराष्ट्राला आदर्श बाप!" ते पुस्तक म्हणजे आमचा बाप आणि आम्ही. डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र.
या पुस्तकाच्या प्रकाशन दिवशीच १००० प्रतींची पहिली आवृत्ती संपली. २३ जानेवारी १९९३ रोजी ग्रंथाली प्रकाशन ने प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या १९९ मराठीआवृत्या निघालेल्या आहेत आणि मराठी साहित्याच्या इतिहासात सर्वात मोठ्या विक्रीचे पुस्तक म्हणून नोंद झालेली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी, तमिळ, फ्रेंच अशा एकूण २० देशी विदेशी भाषांमध्ये अनुवादित झालेले हे पुस्तक. वीस वर्षांत सहा लाख प्रती विकल्या जाणारे हे पुस्तक आजही बेस्ट सेलर म्हणून आहे. मराठी पुस्तकात प्रसन्न शैली व आशावादी जीवनदृष्टी दिसते. साहित्य अकादमी पुरस्कार ( पंजाबी भाषा) मिळालेला आहे.
डॉ. नरेंद्र यांचे बालपण वडाळ्याच्या वस्तीत गेले त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी एस्सी करून १९८३ मध्ये अमेरिकेतील विद्याीठामार्फत डॉक्टरेट पदवी व सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून बहुमान मिळवला. जाधव यांनी लिहलेले आत्मचरित्र आंबेडकरी चळवळीतून प्रेरणा घेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबीयांची संघर्षाची कहाणी आहे. ही कहाणी डॉ. जाधवांनी सच्या दिलाने मांडली आहे. कोणतेही काम करतांना त्याच्यातला टॉपला जाण्याची प्रेरणा त्यांच्या वडिलांनी त्यांना दिली. डॉ. नरेंद्र जाधव भारतीय रिझर्व बँकेचे प्रधान आर्थिक सल्लागरही , इंग्रजी, मराठी हिंदी विषयात लेखन, नामवंत शिक्षण तज्ञ , समाजशास्त्रज्ञ , ललित लेखक, नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष असे अनेक पदांवर नियुक्ती झाली आहे. कहाणी चार पिढीची संघर्षाची आहे. महत्त्वाकांक्षा आणि तीव्र इच्छाशक्ती असल्यास आर्थिक परिस्थितीवर मात करून कशा प्रकारे आपले ध्येय गाठू शकतो हे त्यांनी व त्यांच्या भावंडांनी उच्चशिक्षण घेवून करून दाखविले.ही सगळी भावंडे कशी घडलीत याची संपूर्ण माहिती ह्यात आहे.
Nice book
ReplyDeleteक्षेत्र कोणतेही कष्टाला पर्याय नाही. कोणतंही क्षेत्र निवडा पण सर्वोच्च ठिकाणी पोहचा... असा संदेश या पुस्तकातून दिलेला आहे.
ReplyDelete