प्रिय वाचकांनो आज आपण ' एक होता कार्व्हर' या चरित्र पुस्तकाची ओळख घेणार आहोत.वीणा गवाणकर यांनी अनुवादित केलेली कार्व्हर यांची जीवनकहाणी. प्रकाशक दिलीप माजगावकर राजहंस प्रकाशन, किँमत १५० रू.
अमेरिकेतील मिझुरी राज्यात डायमंड ग्रोव्ह वाड्यावर मोझेस कार्व्हर आपल्या कुटुंबासह आणि मेरी नावाच्या गुलाम निग्रो स्त्री तिच्या दोन मुलांसह राहत होते.१८६०- ६२ दरम्यान मेरीला तिच्या एका मुलासोबत एका टोळीने रातोरात पळवून नेली. मोझेस यांनी घोड्यांच्या बदल्यात सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु फक्त २ महिन्यांचा मुलगा मिळाला.निग्रोना त्याकाळी अमेरिकेत गुलाम म्हणून वागवले जायचे. मोझेस कार्व्हर सोबत निसर्गात हे अनाथ पोर वाढत होते. लहानणापासूनच रानावनात झाड झुडपे, पक्षांची पिल्ली, मासे यांच्या सोबतच मेरीचे पोर वाढत होते. या मेरीच्या पोराची प्रामाणिक व विनम्र वृत्ती पाहून कार्व्हर कुटुंबात त्याचं नामकरण केलं - जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. निसर्ग शाळेत शिकत असताना वनस्पतींशी जास्त परिचय होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत शिक्षण घेण्यासाठी स्वयंपाक, लाँड्री, बागकाम, गिरणीत काम, सरपण फोडून देणे, अंगण झाडून देणे, गटार खणली,अशी अनेक कामे केली. अनेकदा झोपण्यासाठी गोठ्याचा वापर केला. दारिद्र्याने भरलेली झोळी आणि प्रखर ज्ञान पिपासा असल्याने कष्ट करून शिक्षण घेत राहिले. वनस्पतीशास्त्र व कृषी रसायन, भूमिती, प्राणीशास्त्र यशाखांचा अभ्यास केला. कितीतरी अधिक ज्ञान प्रत्यक्ष निसर्गातून मिळविले आणि त्यामुळेच इतरांच्या पुढे अभ्यासात असतं.१८९४ साली आयोवा स्टेट कॉलेज मधून विज्ञान शाखेची पदवी मिळवून पुढे त्याच कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून अध्यापनही केले. कृषिवर आधारित संशोधन त्यांच्या आयुष्याचा भाग बनला होता. शेती विकासासाठी वेगवेगळे प्रयोग केले. सेंद्रिय शेती, खत, संकल्पना प्रत्यक्षात आणली ती १८९६ मध्ये. ज्याची गरज आपल्याला आपणास १२० वर्षांनी जाणवते यातच त्यांच्या दूरदृष्टीची कल्पना येते.
यशाची एक एक पायरी चढत असताना त्यांनी जमिनीशी नात घट्ट ठेवले व शेती विषयक क्षेत्रात उच्चशिक्षण पूर्ण केले. लोकांच्या आजारावर उपलब्ध वनस्पतींचा वापर व त्याची माहिती सर्वांना करून देणे, मातीतून नीळा रंग शोधून काढला हे संशोधन पेटंट घेवून ते श्रीमंत झाले नाही तर ते संशोधन गरीब जनतेला उपलब्ध करून दिले तेही त्यांना परवडणाऱ्या किमतीत. शेंगदाणा पासून तेल, डिंक, रबर वस्तू तयार केल्या. वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला देणगी दिली. भुईमुग, रताळ
यापासून तब्बल ५०० च्यावर जीवनोपयोगी वस्तू तयार केल्या. आणि जगाच्या पाठीवर ज्यान इतिहासात सोनेरी कर्तृत्व केलं असे हे कार्व्हर . जगातील कोणत्याही शास्त्रज्ञाने केले नसेल एवढे कृषी संशोधन एकट्या कार्व्हर यांनी केले. प्रा. कार्व्हर हे शेती शास्त्रज्ञ तर होतेच ते अर्थशास्त्रज्ञ ही होते. शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत अन्नधान्य टिकविण्याच्या सुलभ पद्धती शिकविल्या.वाळवा, सुकवा तसेच स्वच्छ सूर्यप्रकाशात कोणते अन्नपदार्थ टिकविता येतात याचा याद्या प्रसिद्ध केल्या. अविवाहित कार्व्हरला पैशाचा मोह नव्हता त्यानी संशोधन केंद्रातील पगारवाढ घेतली नाही . शास्त्रज्ञ एडिसनने देवू केलेली एक लाख डॉलरची विनंती देखील मान्य केली नाही. त्यासाठी त्यांना न्यूजर्सीला जावे लागणार होते याबाबत कार्व्हर म्हणतात ' माझी माझ्या बांधवांना जास्त गरज आहे' काय अजब रसायन आहे माती अन माणसांची नाळ कायम ठेवणार! नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण आणि उपयोग मानवी जीवनाच्या समृध्दीच गमक आहे कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलं नाही तर त्याचा वस्तुपाठच घालून दिला आणि हा वस्तुपाठ समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.!ह्या पुस्तकाला उत्कृष्ठ वाडमय पुरस्कार 1981-82 यावर्षी मिळालेला आहे.
खुपच छान
ReplyDeleteNice book
ReplyDeleteVery nice book
ReplyDeleteNice story
ReplyDeleteथोर महात्मे होऊनी गेले चरित्र त्यांचे पहावे जरा, आपणही त्यांच्यासमान व्हावे हाचि सापडे बोध खरा.
ReplyDelete