यशस्वी कहाणी मागे वेदनादायी भूतकाळ असतो.... प्रत्येक वेदनादायक सुरुवातीचा अंत एक यशस्वी कहाणी असते असे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ' अग्निपंख' आत्मकथेच्या प्रस्तावनेत म्हणतात. जीवनाच्या विविध क्षेत्रांत यशस्वी झालेले अनेक व्यक्तिमत्वे आपण पाहतो . अशा व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्यांना जाणून घेण्याची एक तीव्र इच्छा निर्माण होते. आयुष्यात यश मिळवत असताना त्या व्यक्तीने केलेले कष्ट, सहन केलेली उपासमार हे जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा यावाक्याची प्रचिती येते. आपल्या स्वप्नांवर विश्वास असेल तर स्वप्न वास्तवात साकारू शकतो. अशीच एक ध्येयवेड्या स्वप्नाची आत्मकथा या पुस्तकातून आपण अनुभवतो.
अपयश यशाची पहिली पायरी आहे असे आपण म्हणतो परंतु अप यशाच्या अनेक पायऱ चढून गेल्यावर यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या भरत आंधळे यांचा प्रवास स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वांनाच जीवन प्रेरणा देणारा आहे. गरुडझेप हे पुस्तक स्टडी सर्कलने प्रकाशित केले आहे दुसरी आवृत्ती २०१२ मध्ये प्रकाशित असून किँमत १०० रू. आहे.या पुस्तकाची अक्षर मांडणी सुबक, वाचनीय स्वरूपाची असून पुस्तकाच्या आश्याला अनुसरून चित्रे दिली आहेत.
गरुडझेप यात धडा पहिला यात चेपलेल शिक्षण, चेपलेला मी, दुसरा धडा- गंगेत घोडं न्हालं, तिसरा धडा- संघर्षातून ध्येयाकडे, चौथा धडा- हाती आलेले सोडून पुन्हा ध्येयाकडे, आणि पाचव्या धड्यात ही फक्त झुंजुमुंजू पहाट उजेडायची आहे असे वर्णन केले आहे. लेखकाचा भूतकाळ, बालपण शिक्षणासाठी आजीची धडपड , कौटुंबिक पार्शवभूमी गरिबीची असूनही आपल्या नातवाने शिकून नोकरी करावी असे आजीला वाटत असते व ती त्यासाठी धडपड करते . दहावीत ५४ टक्के मार्कस मिळवून पास झालेले भरत आंधळे पुढे नाशिकला एमआयडीसी वसाहतीत काम करून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले. खिशात एक रुपया नसतांना नाशिक मध्ये एका ओळखीच्या ठिकाणी राहण्याची सोय कशीतरी झालेली, वेळप्रसंगी शिळ्या भाकरीचे तुकडे उकळत्या पाण्यात टाकून खाल्ले, किराणा दुकानदाराने टाकून दिलेले शिळे पाव खावून दिवस काढले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांच्या संपर्कामुळे स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार लेखकाच्या मनात आला व त्या दृष्टीने प्रयत्न केले. नाशिक ते पुणे यशदा, जयकर ग्रंथालय असा प्रवास सायकल वरून केला. कमवा शिका योजनेतून काम केले. पी एस आय ची परीक्षा पास झाल्या नंतर मुख्य परीक्षेत यश हुलकावणी देत होते. असे सगळे प्रसंग हा जीवन प्रवास किती रोमांचकारी होता हे वाचताना जाणवते. एकदा तर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . पण एकदा त्यांनी विचार केला की जेव्हाअंबादास सारखा विद्यार्थी वडील दगड फोडण्याचे काम करतात त्यांच्या कष्टाचे चीज करून नेट परीक्षा पास होवून प्राध्यापक होतो तर आपण का नाही करू शकत असा विचार करून पुन्हा जोमाने युपीएससी परीक्षांचा अभ्यास करतात. लेखक " जगात वेडी समजली जाणारी माणसेच इतिहास घडवतात आणि स्वतः ला शहाणी समजणारी माणसे हा इतिहास नंतर वाचतात आणि त्यातून धडे घेतात" या विचाराने शेवटचा प्रयत्न करतात व त्यात यश मिळवितात.कलेक्टर झाल्याची बातमी पहिल्यांदा आजीला कळवतात. असे अनेक प्रसंग वाचतांना आपण भावूक होतो.
आयुष्यातील स्वप्नपूर्तीचे दिवस अनुभवून सुद्धा लेखक मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करत आहेत. भरत आंधळे यांचा हा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
Inspirational life story
ReplyDeleteNice book
ReplyDeleteस्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय प्रेरणादायी असे पुस्तक आहे.
ReplyDelete