भारताचे ११ वे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मरणोत्तर प्रसिद्ध झालेले चरित्र. रूपा पब्लिकेशन ने प्रकाशित केलेले या पुस्तकाची पृष्ठे ११९ असून किंमत रू २९५ एवढी आहे.
अग्निपंख हे पुस्तक आपल्या सर्वांना माहीत असेलच. माय लाईफ हे त्यांचे चरित्र पुस्तकाची छपाई आकर्षक असून त्यात भरपूर चित्रे आहेत.या पुस्तकात कलाम यांनी अनेक महत्तवपूर्ण घटनांचा उल्लेख केला आहे. ज्यावेळेस SLV ३ यशस्वी उड्डाण झाले त्यानंतर इंदिराजीनी त्यांना भेटावयास बोलावले तेव्हा त्यांनी आपले गुरू सतीश धवन यांना कोणते कपडे घालायचे असा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले कोणतेही कपडे घाल. तुला मिळालेले यश हे महत्वाचे आहे कपडे नाहीत.हा उपदेश त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवला. केव्हाही त्यांचे वकपडे म्हणजे जास्तीत जास्त तीन सुट व ५/६ शर्ट .
डॉ. कलाम हे सदैव तरुणांना प्रेरणा देत. म्हणून आजही अनेक तरुणांचे ते रोल मॉडेल आहेत.भारतातील जनतेच्या मनात आजही त्यांच्याप्रती आदर आहे. जनतेचे ते सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती होते.. संपूर्ण आयुष्य शास्त्रीय संशोधनात घालवणारे त्यांना जेव्हा कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर देण्यात अाली तेव्हा त्यांनी ती नाकारली. सध्या चालू संशोधनाला अधिक त्यांची गरज आहे असे सांगितले.
डॉ. कलाम यांनी या पुस्तकात तरुणांना पुढील उपदेश केला आहे -- १ आपल्या जीवनाचे ध्येय ठरवा.२ आयुष्यात मिळविता येईल तेवढे ज्ञान मिळवा ३ मनापासून कष्ट करा. ४ नेहमी उत्तम पुस्तके वाचा.५ स्वतः ला विचारा आपल्या मृत्यूनंतर लोक आपली कुठली गोष्ट लक्षात ठेवतील.
डॉ. अब्दुल कलाम धर्मनिरपेक्ष वातावरणात वाढले. राष्ट्रपती म्हणून शपथ घेताना ३७ लोकांना निमंत्रण पाठवली होती. त्यात त्यांच्या मोठा भाऊ, रामेश्वरम् मंदिराचे पुजारी, आणि गावातील तरुण इमाम व अनेक शिक्षक होते. डॉ. कलाम यांचे नातेवाईक राष्ट्रपती भवनात काही दिवस राहिले ते गेल्यावर त्यांच्या पाहुणचारचा खर्च सरकारी तिजोरीत भरला. दरवर्षी रमजान महिन्यात राष्ट्रपती इफ्तार पार्टी करतात कलाम यांनी ते बंद करून त्यावर होणाऱ्या खर्चा एवढ्या किमतीचे धान्य गरीब विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात द्यायला लावले होते.
ज्यांनी आपल्या आयुष्यात भरपूर संघर्ष केला व आलेल्या परिस्थितीशी सामना करून ज्यांनी आपल्या आयुष्यात यशाचे उंच शिखर गाठले. अशा व्यक्तिमत्वाचे हे प्रेरणा देणारे चरित्र ' माय लाईफ ( An Elestreted Biography).
संदर्भ _ महाराष्ट्र टाइम्स.
Madam you have taken good effort for this , reader get brief detail about this book.Best wishes for you efforts .
ReplyDeleteNice book
ReplyDeleteभारत हा देश एक दिवस महासत्ता होईल अशी स्वप्ने काही लोकांनी पाहिली होती त्यापैकी एक म्हणजेच भारताचे महान राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम. तरुणाईला अतिशय प्रेरणादायी असे हे चरित्र आहे.
ReplyDelete