Skip to main content

जागतिक ग्रंथ दिन








नमस्कार प्रिय वाचकांनो





मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव च्या ग्रंथालय विभागामार्फत आज जागतिक ग्रंथ दिनाचे औचित्य साधून हा ब्लॉग तयार करण्यात आलेला आहे. 
आपल्या संस्क्रुतीत ग्रंथांची प्रदीर्घ परंपरा आहे.  आधुनिकिकरणामुळे पुस्तके इंटरनेट आणि मोबाईल वर सहज उपलब्ध होत आहेत. तंत्रज्ञान मुळे वाचन प्रेम कमी झाले नाही तर फक्त माध्यम बदलले आहेत. वाचनसंस्कृती ही प्रगल्भ होत असून वाचना सोबत आता वाचक स्वतः ला व्यक्त करू लागली आहेत. सोशल मीडियाचां वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे त्याचाच विचार करून ब्लॉग या माध्यमाचा वापर करून आपल्याशी संवाद साधणार आहे.
जागतिक ग्रंथ दिंन _ २३ एप्रिल 

विल्यम शेकसपिअरच्या वाडमयाने जगभर गेली चार शतकांपेक्षा जास्त वर्षे गारूड केलेले आहे. २३ एप्रिल १५६४ रोजी जन्मलेले v २३ एप्रिल १६१६ रोजी मृत्युदिन शेक्सपिअरचा आहे. छपाईचा शोध लागल्यानंतर जगातील सर्वाधिक छापला गेलेला , वाचला गेलेला, चर्चा झालेला आपल्या साहित्यावर लिहिले गेलेल्या, अनुवाद झालेला हा सर्वात लोकप्रिय लेखक आहे. तसेच त्यांच्या लेखनावर आधारित सर्वात जास्त साहित्यनिर्मिती विविध भाषांमधून झालेली आहे. त्यांचा जन्मदिन व स्मृतिदन २३ एप्रिल हा जागतिक ग्रंथदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. साहित्याच्या प्रांतातले जागतिक सम्राटपद वर्षानुवर्षे त्यांचे नाव अढळपणे सर्वमान्य झालेले आहे.  
युनेस्कोने ग्रंथांचे वाचन, प्रकाशन व त्यांच्या स्वामित्व हक्का विषयी मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण व्हावी यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता २३ एप्रिल हा जागतिक ग्रंथदिन व स्वामित्व हक्क दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

        *ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा खजिना. जीवनाला समृद्ध करणारे सर्वच ज्ञान मग ते धर्म.. कला.. विज्ञान.. तंत्रज्ञान कोणतेही असो ग्रंथात दडलेय. ग्रंथ हा विवेक शिकवतो. जगाकडे बघण्याची दृष्टी देतो. मानवीय प्रगतीचा हा सर्वात मोठा स्रोत आहे.*
        *लोकमान्यांनी ग्रंथाला गुरु संबोधले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रगतीसाठी वाचन हा मंत्र दिलाय. आमच्या वेद.. उपनिषदे.. पुराणे.. गीता तसेच संत साहित्याने हे मनुष्य जीवन समृद्ध केलेय. या भूमितील व्यासमुनी असो वा वाल्मिकी जगविख्यात लेखक ठरलेत.*
        *हीच परंपरा जगतगुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानदेवांनी १६ व्या वर्षी तत्वज्ञान सांगणारी ज्ञानेश्वरी, तर छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत भाषेत ग्रंथ लिहून कायम ठेवली.* 
        *गावातील ग्रंथालय हे गावाचे सांस्कृतिक वैभव आहे. वाचक म्हणजे देशातील सुज्ञ नागरिक अशी ओळख आहे. ग्रंथ वाचनामुळेच देशाला दिशा देणारे महापुरुष घडलेत. पुस्तक म्हणजे जीवनास धडा देणारा इतिहास.. जीवन सुखद करणारे वर्तमान आणि जीवन उन्नत करणारा भविष्यकाळ.*
        *नविन पुस्तक  उत्सुकतेने बघणे. त्याचा गंध अनुभवणे.. चाळणे.. वाचणे हा अवर्णनीय आनंद आहे. पुस्तक प्रेम करायला शिकवते. पुस्तक हे केवळ पुस्तकच नसते. पुस्तक आशा.. आकांक्षानी जीवन सदैव प्रवाही ठेवते. त्यात रमून स्वर्गीय सुखाची अनुभुती प्राप्त करता येते. पुस्तक ही प्रत्येकाची मर्मबंध ठेव असते.*
     

*_पुस्तकातील खूण कराया_*
*_दिले एकदा पीस पांढरे;_*
*_पिसाहुनि सुकुमार काहिसे_*
*_देता घेता त्यात थरारे._*

*_मेजावरचे वजन छानसे_*
*_म्हणून दिला नाजूक शिंपला;_*
*_देता घेता उमटे काही_*
*_मिना तयाचा त्यावर जडला_*

*_असेच काही द्यावे घ्यावे_*
*_दिला एकदा ताजा मरवा_*
*_देता घेता त्यात मिसळला_*
*_गंध मनातिल त्याहून हिरवा._*

*गीत : इंदिरा संत*       ✍
*संगीत : गिरीश जोशी*
*स्वर : पद्मजा फेणाणी-जोगळेकर

       *!! घरी रहा !! सुरक्षित रहा !!*

Comments

  1. Ujjwala, mam, congratulations to you very much. Very nice activities. What you have written to justify today is very nice. Happy "Granth Din".

    ReplyDelete
  2. खुप छान पुस्तक दिनाच्या शुभेच्छा

    ReplyDelete
  3. करसाळे मॅडम, अतिशय सुंदर उपक्रम आहे. ब्लागही छान आहे.विशेषतः इंदिरा संतांची कविता वाचताना मनाला मोरपंखीस काही स्पर्शून गेलं.
    खूप खूप छान मॅडम,
    धन्यवाद!

    ReplyDelete
  4. अभिनव उपक्रम..ग्रंथपालांना ब्लॉग काढून आशा पद्धतीने वाचनासाठी मंच उभा केलेला हे मी पहिल्यांदाच पाहिलं..खरच अभिनंदनीय आहे..

    ReplyDelete
  5. Madam this facility provides us excellent platform to be introduced with biographies. Thanks a lot for it, and wishes to it.

    ReplyDelete
  6. Tumacha ha upkram khup chan ahe madam. Tyamule vachnachi godi lagate

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...

लाल बहादुर शास्त्री जयंती: 2 ऑक्टोबर 2024

भारताचे दुसरे पंतप्रधान, लाल बहादूर शास्त्री, आपल्या साधेपणा, देशभक्ती आणि दृढ इच्छाशक्तीसाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाला उजळून दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे निर्णय घेतले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारताने मिळवलेला विजय हा त्यांच्या नेतृत्वाचेच फळ होते. "जय जवान जय किसान" हे त्यांचे प्रसिद्ध घोषणाशब्द आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी देशाच्या सैनिकांचे आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शास्त्रीजींचा साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा पैलू होता. ते अतिशय साधा जीवन जगत होते. त्यांच्या साधेपणामुळेच जनतेचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते. त्यांच्या निधनानंतरही लोक त्यांना आदराची भावना बाळगतात. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला. परंतु त्यांनी कधीही धीर सोडला नाही. त्यांची दृढ इच्छाशक्ती आणि धैर्य हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. आजच्या युव पिढीला शास्त्रीजींच्या जीवनातून बरेच काही शिकायला मिळते. त्यांच्या साधेपणा, दे...

महात्मा गांधी जयंती: 2 ऑक्टोबर 2024

महात्मा गांधी, ज्यांना बापू म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे एक महान नेते होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांवर आधारित एक अद्वितीय स्वातंत्र्य लढा उभारला. त्यांच्या विचारांनी भारतालाच नव्हे तर जगभरातील अनेक देशांना प्रेरणा दिली. अहिंसा आणि सत्याग्रह: गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह ही दोन शक्तिशाली शस्त्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी हिंसाचाराचा विरोध करून, प्रेम आणि करुणेच्या मार्गाने ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडले. त्यांचे सत्याग्रह चळवळी, विशेषतः दांडी यात्रा, जगभरात प्रसिद्ध झाली. भारतीय स्वातंत्र्य संग्राम: गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नवी दिशा मिळाली. त्यांनी खादी चळवळ, असहकार चळवळ आणि भारत छोड़ो आंदोलन सुरू करून ब्रिटिशांना मोठा धक्का दिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. एक विश्व नेता: गांधीजी केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे नेते होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव आफ्रिका, अमेरिका आणि युरोपसारख्या देश...