प्र. के. अत्रे हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व . शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता, उत्कृष्ट वक्ता प्रसिद्ध होते. त्यांचे पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे. उर्फ केशवकुमार नावाने ते लिहत असत. त्यांचे आत्मचरित्र क-हेचें पाणी. याचे पाच खंडात त्यांनी विस्तृत स्वरूपात जीवन प्रवास वर्णन केला आहे झेंडूची फुले' विडंबन काव्य, 'गुद्दे आणि मुद्दे', मन हेलावून टाकणारे त्यांचे समधीवरील अश्रू आणि मनाला हुंदके घालायला लावणारी ' हुंदके' हे ग्रंथ मनात घर करून जातात.
हिम्मत काय असते हे आचार्य अत्रे यांचे क-हेचें पाणी पाच खंडातील २५०१ पृष्टांचे आत्मचरित्र वाचले म्हणजे समजते. समुद्रात अनेक नावाडी नाव सोडून असावेत आणि एकदम अचानक तुफान यावे, तुफान पाहून सर्वच नावाडी माघारी फिरतात, परंतु या तुफानालाही न घाबरता एका नावड्याने आपली नाव तूफानातून पुढेच घेवून जावी आणि किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना वाटावे आता या नावेला कधीही जलसमाधी मिळते की काय? दुसऱ्याच क्षणी नावाड्याने नाव व्यवस्थित तूफानातून बाहेर काढावी आणि किनाऱ्यावरील लोकांनी सांगावे बाबा वळव रे आता माघारी नाव सुरक्षितस्थळी. परंतु खट्याळ पोराने जसे न ऐकता परत दुसऱ्या तूफानाला सामोरी जावे असा हा काहीसा अत्रेंच्या बाबतीत अनुभव आत्मचरित्र वाचतांना येत जातो. हा हिमतीचा बादशहा खरोखरच आर्थिकदृष्ट्या कफल्लक असताना देखील केवळ कशावर तरला असेल तर फक्त स्वतः च्या हिमतीवर असलेल्या भरवशावर.
हिम्मत, स्वतः वर असलेला भरवसा हे काय असते, तो कसा टिकवायचा असतो हे ज्यांना जाणायचे त्यांनी हे आत्मचरित्र वाचावे. शब्दांचे शक्ति, सामर्थ्य, वजन हे माहीत करून घ्यायचे तर क-हेचें पाणी वाचले पाहिजे .
मी कसा झालो? मध्ये ही त्यांनी त्यांच्या बद्दल लिहले आहे. मोरूची मावशी, तो मी नव्हेच, साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी या सारख्या नाटकांतून सामाजिक प्रश्नांवर हसत हसत भाष्य करत डोळ्यांत अंजन घालत अंतर्मुख करायला लावणारे विषय हाताळले प्रवासवर्णन, चरित्र, कादंबरी ही त्यांनी लिहिली. त्यांनी दिग्दर्शित केलेला श्यामची आई ह्या चित्रपटाला १९५४ साली राष्ट्रीय पुरस्कारात सुवर्ण कमळ मिळाले होते. ते .फर्डे वक्ते असल्यामुळे जनमानसावर प्रभाव होता. आपल्या वतृत्वाने श्रोत्यांना भारावून टाकत. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.
आचार्य अत्रे जीवनाबद्दल म्हणतात, " जीवनाचे हे विलक्षण वेड माझ्यामध्ये कसे आले. लहानपणाासून निसर्गाची अन् इतिहासाची मला सोबत मिळाली. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या क-हेचें काठी मी जन्मलो आणि तिच्याच अंगाखांद्यावर जेजुरीच्या खडोबाच्या भांडाऱ्याने वाढलो, मोठा झालो. उशाला शिवछत्रपतींचा पुरंदर किल्ला अध्टप्रहर पहारा करी, तर श्री सोपानदेवाची भक्तिवीणा सदैव वाजे"
Nice story
ReplyDeleteAtre sarkhya diggaj lekhachya kreheche pani atmachritracha saraush vachnyas milala madam dhanyavad
ReplyDeleteNice book
ReplyDeleteआचार्य अत्रे यांचा सर्वच क्षेत्रात मुक्त संचार होता. त्यांनी कला, साहित्य, संगीत, राजकारण, नाटक,पत्रकारिता अशा सर्वच क्षेत्रात मुक्तपणे संचार केला आहे. अत्रेंसारखा दुसरा तडफदार वक्ता होणे नाही. झाले बहु, होतील बहु, परंतु यासम हा.
ReplyDelete