Skip to main content

माय लाईफ ( An Elestreted Biography)_ लेखक डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम

भारताचे ११ वे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मरणोत्तर प्रसिद्ध झालेले चरित्र. रूपा पब्लिकेशन ने प्रकाशित केलेले या पुस्तकाची पृष्ठे ११९ असून किंमत रू २९५ एवढी आहे.
अग्निपंख हे पुस्तक आपल्या सर्वांना माहीत असेलच. माय लाईफ हे त्यांचे चरित्र पुस्तकाची छपाई आकर्षक असून त्यात भरपूर चित्रे आहेत.या पुस्तकात कलाम यांनी अनेक महत्तवपूर्ण घटनांचा उल्लेख केला आहे. ज्यावेळेस SLV ३ यशस्वी उड्डाण झाले त्यानंतर इंदिराजीनी त्यांना भेटावयास बोलावले तेव्हा त्यांनी आपले गुरू सतीश धवन यांना कोणते कपडे घालायचे  असा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले कोणतेही कपडे घाल. तुला मिळालेले यश हे महत्वाचे आहे कपडे नाहीत.हा उपदेश त्यांनी  आयुष्यभर लक्षात ठेवला. केव्हाही त्यांचे वकपडे म्हणजे जास्तीत जास्त तीन सुट व ५/६ शर्ट .
डॉ. कलाम हे सदैव तरुणांना प्रेरणा देत. म्हणून आजही अनेक तरुणांचे ते रोल मॉडेल आहेत.भारतातील जनतेच्या मनात आजही त्यांच्याप्रती आदर आहे. जनतेचे ते सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती होते.. संपूर्ण आयुष्य शास्त्रीय संशोधनात घालवणारे त्यांना जेव्हा कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर देण्यात अाली तेव्हा त्यांनी ती नाकारली. सध्या चालू संशोधनाला अधिक त्यांची गरज आहे असे सांगितले.
डॉ. कलाम यांनी या पुस्तकात तरुणांना पुढील उपदेश केला आहे -- १ आपल्या जीवनाचे ध्येय ठरवा.२ आयुष्यात मिळविता येईल तेवढे ज्ञान मिळवा ३ मनापासून कष्ट करा. ४ नेहमी उत्तम पुस्तके वाचा.५ स्वतः ला विचारा आपल्या मृत्यूनंतर लोक आपली कुठली गोष्ट लक्षात ठेवतील.
डॉ. अब्दुल कलाम धर्मनिरपेक्ष वातावरणात वाढले. राष्ट्रपती म्हणून शपथ घेताना ३७ लोकांना निमंत्रण पाठवली होती. त्यात त्यांच्या मोठा भाऊ, रामेश्वरम् मंदिराचे पुजारी, आणि गावातील तरुण इमाम व अनेक शिक्षक होते. डॉ. कलाम यांचे नातेवाईक राष्ट्रपती भवनात काही दिवस राहिले ते गेल्यावर त्यांच्या पाहुणचारचा खर्च सरकारी तिजोरीत भरला. दरवर्षी रमजान महिन्यात राष्ट्रपती इफ्तार पार्टी करतात कलाम यांनी ते बंद करून त्यावर होणाऱ्या खर्चा एवढ्या किमतीचे धान्य गरीब विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात द्यायला लावले होते. 
ज्यांनी आपल्या आयुष्यात भरपूर संघर्ष केला व आलेल्या परिस्थितीशी सामना करून ज्यांनी आपल्या आयुष्यात यशाचे उंच शिखर गाठले. अशा व्यक्तिमत्वाचे हे प्रेरणा देणारे चरित्र ' माय लाईफ ( An Elestreted Biography).
संदर्भ _ महाराष्ट्र टाइम्स.

Comments

  1. Madam you have taken good effort for this , reader get brief detail about this book.Best wishes for you efforts .

    ReplyDelete
  2. भारत हा देश एक दिवस महासत्ता होईल अशी स्वप्ने काही लोकांनी पाहिली होती त्यापैकी एक म्हणजेच भारताचे महान राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम. तरुणाईला अतिशय प्रेरणादायी असे हे चरित्र आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल

आज 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांची जयंती. भारतीय संविधानाचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ , समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतीय  बौद्ध धर्माचे पुनरू ज्ज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. त्यांनी कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटले. डॉ. आंबेडकरांची बुध्दीमत्ता अफाट व अचाट होती. त्यांचे वाचन व लेखन फार मोठे होते. त्यांच्याकडे पंचवीस हजारांवर ग्रंथांचा व्यक्तिगत संग्रह होता. त्यांनी ग्रंथलेखन प्रामुख्याने इंग्रजीतूनच केलेले आहे. मराठी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन मराठीत दिसते. त्यांच्या सर्व ग्रंथांची मराठी भाषांतर उपलब्ध आहेत. योगदान - भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, घटनात्मक, औंद्योगिक  क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. वाचनवेड , पुस्तक प्रेम -  डॉ. आंबेडकर यांना वाचनाचे प्रचंड वेड ...

क-हेचें पाणी - प्र. के. अत्रे

प्र. के. अत्रे  हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व . शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता, उत्कृष्ट वक्ता प्रसिद्ध होते. त्यांचे पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे. उर्फ केशवकुमार नावाने ते लिहत असत. त्यांचे आत्मचरित्र क-हेचें पाणी. याचे पाच खंडात त्यांनी विस्तृत स्वरूपात जीवन प्रवास वर्णन केला आहे झेंडूची फुले' विडंबन काव्य, 'गुद्दे आणि मुद्दे', मन हेलावून टाकणारे त्यांचे समधीवरील अश्रू आणि मनाला हुंदके घालायला लावणारी ' हुंदके' हे ग्रंथ मनात घर करून जातात. हिम्मत काय असते हे आचार्य अत्रे यांचे क-हेचें  पाणी पाच खंडातील २५०१ पृष्टांचे आत्मचरित्र वाचले म्हणजे समजते. समुद्रात अनेक नावाडी नाव सोडून असावेत आणि एकदम अचानक तुफान यावे, तुफान पाहून सर्वच नावाडी माघारी फिरतात, परंतु या तुफानालाही न घाबरता एका नावड्याने आपली नाव तूफानातून पुढेच घेवून जावी आणि किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना वाटावे आता या नावेला कधीही जलसमाधी मिळते की काय? दुसऱ्याच क्षणी नावाड्याने नाव व्यवस्थित तूफानातून बाहेर काढावी आणि किनाऱ्यावरील लोकांनी सांगावे बाबा वळव रे आता माघारी नाव...

वाचन प्रेरणा दिन - 15 ऑक्टोबर 2025

  वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन  संविधान उद्देशिकेचे वाचन करून तसेच पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाची खात्री   या भित्तीपत्रकाचे मा. कुमारराव निकम यांच्या हस्ते उद्घाटन करून साजरा करण्यात आला. भारताचे महान वैज्ञानिक, मिसाईल Man म्हणून ओळखले जाणारे, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस. त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून त्यांनी दिलेला वाचल तर वाचाल या संदेशाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्म दिवस वाचनप्रेरणा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2015 पासून हा दिवस वाचन प्रेरणा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. डॉ. कलाम यांचे जीवन म्हणजे ज्ञानाची अखंड साधना होती. त्यांची गरिबीतून राष्ट्रपती पदापर्यंतची भरारी ही केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेवर व वाचनावरील निस्सिम प्रेमामुळेच शक्य झाले . पुस्तके त्यांचे मित्र होते. त्यांनी अनेक तरुणांना वाचनातून आत्मशोध व प्रगतीचा मार्ग शोधण्यासाठी प्रेरित केले. आजच्या या प्रेरणादिन कार्यक्रमा...