Skip to main content

आमचा बाप आन आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव

प्रसिद्ध अभिनेता निळू फुले यांनी ज्या पुस्तकाबददल अशी प्रतिक्रिया दिली - " साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि नरेंद्र जाधवांनी महाराष्ट्राला आदर्श बाप!" ते पुस्तक म्हणजे आमचा बाप आणि आम्ही. डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र.
या पुस्तकाच्या प्रकाशन दिवशीच १००० प्रतींची पहिली आवृत्ती संपली.  २३ जानेवारी १९९३ रोजी ग्रंथाली प्रकाशन ने प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या १९९  मराठीआवृत्या निघालेल्या आहेत आणि मराठी साहित्याच्या इतिहासात सर्वात मोठ्या विक्रीचे पुस्तक म्हणून नोंद झालेली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी, तमिळ, फ्रेंच अशा एकूण २० देशी विदेशी  भाषांमध्ये अनुवादित झालेले हे पुस्तक. वीस वर्षांत सहा लाख प्रती विकल्या जाणारे हे पुस्तक  आजही बेस्ट सेलर म्हणून आहे. मराठी पुस्तकात प्रसन्न शैली व आशावादी जीवनदृष्टी दिसते. साहित्य अकादमी पुरस्कार ( पंजाबी भाषा) मिळालेला आहे.
 डॉ. नरेंद्र यांचे बालपण वडाळ्याच्या वस्तीत गेले त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी एस्सी करून १९८३ मध्ये अमेरिकेतील विद्याीठामार्फत डॉक्टरेट पदवी व सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून बहुमान मिळवला. जाधव यांनी लिहलेले आत्मचरित्र आंबेडकरी चळवळीतून प्रेरणा घेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबीयांची संघर्षाची कहाणी आहे. ही कहाणी डॉ. जाधवांनी सच्या दिलाने मांडली आहे. कोणतेही काम करतांना त्याच्यातला टॉपला जाण्याची प्रेरणा त्यांच्या वडिलांनी त्यांना दिली.  डॉ. नरेंद्र जाधव भारतीय रिझर्व बँकेचे प्रधान आर्थिक सल्लागरही , इंग्रजी, मराठी हिंदी विषयात लेखन, नामवंत शिक्षण तज्ञ , समाजशास्त्रज्ञ , ललित लेखक, नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष असे अनेक पदांवर नियुक्ती झाली आहे. कहाणी चार पिढीची संघर्षाची आहे. महत्त्वाकांक्षा आणि तीव्र इच्छाशक्ती असल्यास आर्थिक परिस्थितीवर मात करून कशा प्रकारे आपले ध्येय गाठू शकतो हे त्यांनी व त्यांच्या भावंडांनी उच्चशिक्षण घेवून करून दाखविले.ही सगळी भावंडे कशी घडलीत याची संपूर्ण माहिती ह्यात आहे. 

Comments

  1. क्षेत्र कोणतेही कष्टाला पर्याय नाही. कोणतंही क्षेत्र निवडा पण सर्वोच्च ठिकाणी पोहचा... असा संदेश या पुस्तकातून दिलेला आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल

आज 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांची जयंती. भारतीय संविधानाचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ , समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतीय  बौद्ध धर्माचे पुनरू ज्ज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. त्यांनी कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटले. डॉ. आंबेडकरांची बुध्दीमत्ता अफाट व अचाट होती. त्यांचे वाचन व लेखन फार मोठे होते. त्यांच्याकडे पंचवीस हजारांवर ग्रंथांचा व्यक्तिगत संग्रह होता. त्यांनी ग्रंथलेखन प्रामुख्याने इंग्रजीतूनच केलेले आहे. मराठी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन मराठीत दिसते. त्यांच्या सर्व ग्रंथांची मराठी भाषांतर उपलब्ध आहेत. योगदान - भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, घटनात्मक, औंद्योगिक  क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. वाचनवेड , पुस्तक प्रेम -  डॉ. आंबेडकर यांना वाचनाचे प्रचंड वेड ...

क-हेचें पाणी - प्र. के. अत्रे

प्र. के. अत्रे  हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व . शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता, उत्कृष्ट वक्ता प्रसिद्ध होते. त्यांचे पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे. उर्फ केशवकुमार नावाने ते लिहत असत. त्यांचे आत्मचरित्र क-हेचें पाणी. याचे पाच खंडात त्यांनी विस्तृत स्वरूपात जीवन प्रवास वर्णन केला आहे झेंडूची फुले' विडंबन काव्य, 'गुद्दे आणि मुद्दे', मन हेलावून टाकणारे त्यांचे समधीवरील अश्रू आणि मनाला हुंदके घालायला लावणारी ' हुंदके' हे ग्रंथ मनात घर करून जातात. हिम्मत काय असते हे आचार्य अत्रे यांचे क-हेचें  पाणी पाच खंडातील २५०१ पृष्टांचे आत्मचरित्र वाचले म्हणजे समजते. समुद्रात अनेक नावाडी नाव सोडून असावेत आणि एकदम अचानक तुफान यावे, तुफान पाहून सर्वच नावाडी माघारी फिरतात, परंतु या तुफानालाही न घाबरता एका नावड्याने आपली नाव तूफानातून पुढेच घेवून जावी आणि किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना वाटावे आता या नावेला कधीही जलसमाधी मिळते की काय? दुसऱ्याच क्षणी नावाड्याने नाव व्यवस्थित तूफानातून बाहेर काढावी आणि किनाऱ्यावरील लोकांनी सांगावे बाबा वळव रे आता माघारी नाव...

वाचन प्रेरणा दिन - 15 ऑक्टोबर 2025

  वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन  संविधान उद्देशिकेचे वाचन करून तसेच पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाची खात्री   या भित्तीपत्रकाचे मा. कुमारराव निकम यांच्या हस्ते उद्घाटन करून साजरा करण्यात आला. भारताचे महान वैज्ञानिक, मिसाईल Man म्हणून ओळखले जाणारे, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस. त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून त्यांनी दिलेला वाचल तर वाचाल या संदेशाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्म दिवस वाचनप्रेरणा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2015 पासून हा दिवस वाचन प्रेरणा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. डॉ. कलाम यांचे जीवन म्हणजे ज्ञानाची अखंड साधना होती. त्यांची गरिबीतून राष्ट्रपती पदापर्यंतची भरारी ही केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेवर व वाचनावरील निस्सिम प्रेमामुळेच शक्य झाले . पुस्तके त्यांचे मित्र होते. त्यांनी अनेक तरुणांना वाचनातून आत्मशोध व प्रगतीचा मार्ग शोधण्यासाठी प्रेरित केले. आजच्या या प्रेरणादिन कार्यक्रमा...