Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंती - 26 जुन 2020

आज दि. 26 जुन रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांची जयंती. शाहू महाराजांचा हा जन्म दिवस ' सामाजिक न्याय दिवस' म्हणून साजरा केला जातो. कार्य -  शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले . स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी ई. स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. ई. स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी निपाणी येथे ' डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वदोक्त प्रकरण शाहू महाराजांचा काळात झाला. राजर्षी शाहूंनी डॉ. आंबेडकर यांना त्यांच्या शिक्षणासाठी, मूकनायक वृत्तपत्रसाठी सहकार्य केले. तसेच चित्रकार आबालाल रहिमा...

जेव्हा माणूस जागा होतो - गोदावरी परुळेकर

उपेक्षितांचं जग दाखवणारी पुस्तकं : *जेव्हा माणूस जागा होतो : कॉ.गोदावरी परुळेकर*  --------------------------------------                              तरुण मुला-मुलींना वंचित, शोषित समूहाविषयी माहिती व्हावी, सामाजिक भान विकसित व्हावं यासाठी मराठीतील उपेक्षितांच्या जगण्यावरच्या  पुस्तकांचा परिचय देणारी ५० पुस्तकांची व्हिडिओ परिचय मालिका सुरू केली आहे. त्यात आज कॉ. *गोदावरी परुळेकर* यांच्या *जेव्हा माणूस जागा होतो*( (मौज प्रकाशन) यांच्या पुस्तकाचा परिचय आहे. ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासींवर होणारे अत्याचार आणि त्याविरोधात आदिवासींना संघटित करून कम्युनिस्ट कार्यकर्त्यानी जो अथक लढा देऊन आदिवासींमध्ये जे आत्मभान जागे केले त्या लढ्याची ही कहाणी आहे.सोबतच्या लिंक मध्ये जरूर ऐका.

माणस - अनिल अवचट

उपेक्षितांचं जग दाखवणारी पुस्तकं : *माणसं (अनिल अवचट)*  --------------------------------------                              तरुण मुला-मुलींना वंचित, शोषित समूहाविषयी माहिती व्हावी, सामाजिक भान विकसित व्हावं यासाठी मराठीतील उपेक्षितांच्या जगण्यावरच्या  पुस्तकांचा परिचय देणारी ५० पुस्तकांची व्हिडिओ परिचय मालिका सुरू केली आहे. त्यात आज प्रसिद्ध लेखक' *अनिल अवचट यांच्या माणसं (मौज प्रकाशन)* या पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. स्थलांतर करणारे मजूर, झोपडपट्टीत राहणारी माणसं, भटके विमुक्त, अमानुष शोषण होणारे हमाल,निपाणीचे तंबाखू कामगार यांच्यासोबत राहून लिहिलेले हे रिपोर्ताज आहेत.सोबतच्या लिंक मध्ये जरूर ऐका.      https://youtu.be/up34bQ93_pw  

दुष्काळ आवडे सर्वांना - पुस्तक परिचय

पुस्तक परिचय : दुष्काळ आवडे सर्वांना  -----------------------------------------------------                                तरुण मुला-मुलींना वंचित, शोषित समूहाविषयी माहिती व्हावी, सामाजिक भान विकसित व्हावं यासाठी मराठीतील सामाजिक विषयांवरच्या पुस्तकांचा परिचय देणारी ५० पुस्तकांची व्हिडिओ मालिका सुरू केली आहे. त्यात आज प्रसिद्ध पत्रकार पी साईनाथ यांच्या 'दुष्काळ आवडे सर्वांना'(अक्षर प्रकाशन) या पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. 13 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या भारतातील या दर्जेदार पुस्तकाविषयीची माहिती सोबतच्या लिंक मध्ये जरूर ऐका.     https://youtu.be/yjV0LQ-BvwQ       

चरित्रकथा प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल

दिनांक १५ मे २० रोजी mppmblibrary.blogspot.com येथे ओळख करून दिलेल्या पुस्तकांवर चरित्र कथा प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. ह्यास्पर्धेत  महाराष्ट्रातील विविध भागांतून नांदेड, बुलढाणा, सातारा अशा भागातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे - १) प्रथम क्रमांक - भावना मारू मथुबाई गरवारे महाविद्यालय सांगली २) प्राजक्ता आनंद मिठारी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ३) प्रांजली सुर्यवंशी के आय टी कॉलेज कोल्हापूर विजेत्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन