Skip to main content

गरुडझेप - भरत आंधळे

 यशस्वी कहाणी मागे वेदनादायी भूतकाळ असतो.... प्रत्येक वेदनादायक सुरुवातीचा अंत एक यशस्वी कहाणी असते असे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ' अग्निपंख' आत्मकथेच्या प्रस्तावनेत म्हणतात. जीवनाच्या विविध क्षेत्रांत यशस्वी झालेले अनेक व्यक्तिमत्वे आपण पाहतो . अशा व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्यांना जाणून घेण्याची एक तीव्र इच्छा निर्माण होते. आयुष्यात यश मिळवत असताना त्या व्यक्तीने केलेले कष्ट, सहन केलेली उपासमार हे जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा यावाक्याची प्रचिती येते. आपल्या स्वप्नांवर विश्वास असेल तर स्वप्न वास्तवात साकारू शकतो. अशीच एक ध्येयवेड्या स्वप्नाची आत्मकथा या पुस्तकातून आपण अनुभवतो.

अपयश यशाची पहिली पायरी आहे असे आपण म्हणतो परंतु अप यशाच्या अनेक पायऱ चढून गेल्यावर यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या भरत आंधळे यांचा प्रवास स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वांनाच जीवन प्रेरणा देणारा आहे. गरुडझेप हे पुस्तक स्टडी सर्कलने प्रकाशित केले आहे दुसरी आवृत्ती २०१२ मध्ये प्रकाशित असून किँमत १०० रू. आहे.या पुस्तकाची अक्षर मांडणी सुबक, वाचनीय स्वरूपाची असून पुस्तकाच्या आश्याला अनुसरून चित्रे दिली आहेत.
गरुडझेप यात धडा पहिला यात चेपलेल शिक्षण, चेपलेला मी, दुसरा धडा- गंगेत घोडं न्हालं, तिसरा धडा- संघर्षातून ध्येयाकडे, चौथा धडा- हाती आलेले सोडून पुन्हा ध्येयाकडे, आणि पाचव्या धड्यात ही फक्त झुंजुमुंजू पहाट उजेडायची आहे असे वर्णन केले आहे. लेखकाचा भूतकाळ, बालपण शिक्षणासाठी आजीची धडपड , कौटुंबिक पार्शवभूमी गरिबीची असूनही आपल्या नातवाने शिकून नोकरी करावी असे आजीला वाटत असते व ती त्यासाठी धडपड करते . दहावीत ५४ टक्के मार्कस मिळवून पास झालेले भरत आंधळे पुढे नाशिकला  एमआयडीसी वसाहतीत काम करून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले. खिशात एक रुपया नसतांना नाशिक मध्ये एका ओळखीच्या ठिकाणी राहण्याची सोय  कशीतरी झालेली, वेळप्रसंगी  शिळ्या भाकरीचे तुकडे उकळत्या पाण्यात टाकून खाल्ले, किराणा दुकानदाराने टाकून दिलेले शिळे पाव खावून दिवस काढले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांच्या संपर्कामुळे स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार लेखकाच्या मनात आला व त्या दृष्टीने प्रयत्न केले. नाशिक ते पुणे यशदा, जयकर ग्रंथालय असा प्रवास सायकल वरून केला. कमवा शिका योजनेतून काम केले. पी एस आय ची परीक्षा पास झाल्या नंतर मुख्य परीक्षेत यश हुलकावणी देत होते. असे सगळे प्रसंग हा जीवन प्रवास किती रोमांचकारी होता हे वाचताना जाणवते. एकदा तर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . पण एकदा त्यांनी विचार केला की  जेव्हाअंबादास सारखा विद्यार्थी वडील दगड फोडण्याचे काम करतात त्यांच्या कष्टाचे चीज करून नेट परीक्षा पास होवून प्राध्यापक होतो तर आपण का नाही करू शकत असा विचार करून  पुन्हा जोमाने युपीएससी परीक्षांचा अभ्यास करतात. लेखक " जगात वेडी समजली जाणारी माणसेच इतिहास घडवतात आणि स्वतः ला शहाणी समजणारी माणसे हा इतिहास नंतर वाचतात आणि त्यातून धडे घेतात"  या विचाराने शेवटचा प्रयत्न करतात व त्यात यश मिळवितात.कलेक्टर झाल्याची बातमी पहिल्यांदा आजीला कळवतात. असे अनेक प्रसंग वाचतांना आपण भावूक होतो.
आयुष्यातील स्वप्नपूर्तीचे दिवस अनुभवून सुद्धा लेखक मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करत आहेत. भरत आंधळे यांचा हा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.

Comments

  1. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय प्रेरणादायी असे पुस्तक आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल

आज 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांची जयंती. भारतीय संविधानाचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ , समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतीय  बौद्ध धर्माचे पुनरू ज्ज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. त्यांनी कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटले. डॉ. आंबेडकरांची बुध्दीमत्ता अफाट व अचाट होती. त्यांचे वाचन व लेखन फार मोठे होते. त्यांच्याकडे पंचवीस हजारांवर ग्रंथांचा व्यक्तिगत संग्रह होता. त्यांनी ग्रंथलेखन प्रामुख्याने इंग्रजीतूनच केलेले आहे. मराठी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन मराठीत दिसते. त्यांच्या सर्व ग्रंथांची मराठी भाषांतर उपलब्ध आहेत. योगदान - भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, घटनात्मक, औंद्योगिक  क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. वाचनवेड , पुस्तक प्रेम -  डॉ. आंबेडकर यांना वाचनाचे प्रचंड वेड ...

क-हेचें पाणी - प्र. के. अत्रे

प्र. के. अत्रे  हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व . शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता, उत्कृष्ट वक्ता प्रसिद्ध होते. त्यांचे पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे. उर्फ केशवकुमार नावाने ते लिहत असत. त्यांचे आत्मचरित्र क-हेचें पाणी. याचे पाच खंडात त्यांनी विस्तृत स्वरूपात जीवन प्रवास वर्णन केला आहे झेंडूची फुले' विडंबन काव्य, 'गुद्दे आणि मुद्दे', मन हेलावून टाकणारे त्यांचे समधीवरील अश्रू आणि मनाला हुंदके घालायला लावणारी ' हुंदके' हे ग्रंथ मनात घर करून जातात. हिम्मत काय असते हे आचार्य अत्रे यांचे क-हेचें  पाणी पाच खंडातील २५०१ पृष्टांचे आत्मचरित्र वाचले म्हणजे समजते. समुद्रात अनेक नावाडी नाव सोडून असावेत आणि एकदम अचानक तुफान यावे, तुफान पाहून सर्वच नावाडी माघारी फिरतात, परंतु या तुफानालाही न घाबरता एका नावड्याने आपली नाव तूफानातून पुढेच घेवून जावी आणि किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना वाटावे आता या नावेला कधीही जलसमाधी मिळते की काय? दुसऱ्याच क्षणी नावाड्याने नाव व्यवस्थित तूफानातून बाहेर काढावी आणि किनाऱ्यावरील लोकांनी सांगावे बाबा वळव रे आता माघारी नाव...

वाचन प्रेरणा दिन - 15 ऑक्टोबर 2025

  वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन  संविधान उद्देशिकेचे वाचन करून तसेच पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाची खात्री   या भित्तीपत्रकाचे मा. कुमारराव निकम यांच्या हस्ते उद्घाटन करून साजरा करण्यात आला. भारताचे महान वैज्ञानिक, मिसाईल Man म्हणून ओळखले जाणारे, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस. त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून त्यांनी दिलेला वाचल तर वाचाल या संदेशाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्म दिवस वाचनप्रेरणा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2015 पासून हा दिवस वाचन प्रेरणा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. डॉ. कलाम यांचे जीवन म्हणजे ज्ञानाची अखंड साधना होती. त्यांची गरिबीतून राष्ट्रपती पदापर्यंतची भरारी ही केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेवर व वाचनावरील निस्सिम प्रेमामुळेच शक्य झाले . पुस्तके त्यांचे मित्र होते. त्यांनी अनेक तरुणांना वाचनातून आत्मशोध व प्रगतीचा मार्ग शोधण्यासाठी प्रेरित केले. आजच्या या प्रेरणादिन कार्यक्रमा...