हिंदमाता शिक्षण मंडळ बोरगाव चे आद्य संस्थापक स्वर्गीय मोहनराव पतंगराव पाटील (अण्णा) यांचा आज स्मृतिदिन. दरवर्षी अण्णांचा स्मृतिदिन हिंदमाता शिक्षण मंडळ बोरगाव येथे त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेले कार्य यांना उजाळा दिला जातो. 10 जाने ते 17 जाने. या कालावधीत संकुलात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. व्याख्यानमाला, प्रदर्शन, विद्यार्थी विविध कलागुणदर्शन तसेच विद्यार्थी आरोग्य तपासणी, माता पालक यांच्यासाठी पाककला स्पर्धा, हळदी कुंकू अश्या विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. स्वर्गीय आण्णा ह्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू कै. मोहनराव पतंगराव पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू निर्भीड व्यक्तीमत्व – मोहनराव अण्णांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते. सामाजिक कार्याची तळमळ, स्वच्छ व पारदर्शी कारभार, निर्भीड स्वभाव , ओजस्वी संभाषण कला ही अण्णांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती. १९६७ मध्ये अण्णा जिल्हा परिषदेवर निवडून आले. राजारामबापूनी त्यांना वाळवा पंचायत समितीचे सभापती केले. ‘तालुक्याच्या सर्वां...