आज 12 ऑगस्ट ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर रंगनाथन यांची जयंती. ग्रंथालय हे संग्रहालय न होता ती एक संस्था व्हावी चळवळ व्हावी म्हणून अहोरात्र झिजनाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांना विनम्र अभिवादन! ज्या काळात भारतात ग्रंथालयांना फारसे महत्व प्राप्त झालेले नव्हते त्याकाळात इंग्रजी विषयात पहिला वर्ग मिळवून त्यांनी मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल पद स्वीकारले. त्यांनी प्राध्यापक होण्यापेक्षा ग्रंथपाल होणे पसंद केले. त्याचे कारण म्हणजे ते स्वतः ग्रंथप्रेमी होते, ग्रंथालयां बद्दल त्यांच्या मनात आदर होता. ग्रंथालयांच्या माध्यमातून ज्ञान प्रसाराचे कार्य करता येईल हा विश्वास त्यांना होता. एक मात्र खरे की त्यांचा ग्रंथपाल होण्याचा निर्णय ग्रंथालय शास्त्राच्या आणि ग्रंथालय चळवळीच्या दृष्टीने भाग्याचा ठरला. देशातील ज्ञानाची कवाडे सर्वसामान्यांना विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम त्यांनी रुजवला आणि नंतर तो जोपासण्यासाठी आपले...