नमस्कार प्रिय वाचकांनो
मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव च्या ग्रंथालय विभागामार्फत आज जागतिक ग्रंथ दिनाचे औचित्य साधून हा ब्लॉग तयार करण्यात आलेला आहे.
आपल्या संस्क्रुतीत ग्रंथांची प्रदीर्घ परंपरा आहे. आधुनिकिकरणामुळे पुस्तके इंटरनेट आणि मोबाईल वर सहज उपलब्ध होत आहेत. तंत्रज्ञान मुळे वाचन प्रेम कमी झाले नाही तर फक्त माध्यम बदलले आहेत. वाचनसंस्कृती ही प्रगल्भ होत असून वाचना सोबत आता वाचक स्वतः ला व्यक्त करू लागली आहेत. सोशल मीडियाचां वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे त्याचाच विचार करून ब्लॉग या माध्यमाचा वापर करून आपल्याशी संवाद साधणार आहे.
जागतिक ग्रंथ दिंन _ २३ एप्रिल
विल्यम शेकसपिअरच्या वाडमयाने जगभर गेली चार शतकांपेक्षा जास्त वर्षे गारूड केलेले आहे. २३ एप्रिल १५६४ रोजी जन्मलेले v २३ एप्रिल १६१६ रोजी मृत्युदिन शेक्सपिअरचा आहे. छपाईचा शोध लागल्यानंतर जगातील सर्वाधिक छापला गेलेला , वाचला गेलेला, चर्चा झालेला आपल्या साहित्यावर लिहिले गेलेल्या, अनुवाद झालेला हा सर्वात लोकप्रिय लेखक आहे. तसेच त्यांच्या लेखनावर आधारित सर्वात जास्त साहित्यनिर्मिती विविध भाषांमधून झालेली आहे. त्यांचा जन्मदिन व स्मृतिदन २३ एप्रिल हा जागतिक ग्रंथदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. साहित्याच्या प्रांतातले जागतिक सम्राटपद वर्षानुवर्षे त्यांचे नाव अढळपणे सर्वमान्य झालेले आहे.
युनेस्कोने ग्रंथांचे वाचन, प्रकाशन व त्यांच्या स्वामित्व हक्का विषयी मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण व्हावी यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता २३ एप्रिल हा जागतिक ग्रंथदिन व स्वामित्व हक्क दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
*ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा खजिना. जीवनाला समृद्ध करणारे सर्वच ज्ञान मग ते धर्म.. कला.. विज्ञान.. तंत्रज्ञान कोणतेही असो ग्रंथात दडलेय. ग्रंथ हा विवेक शिकवतो. जगाकडे बघण्याची दृष्टी देतो. मानवीय प्रगतीचा हा सर्वात मोठा स्रोत आहे.*
*लोकमान्यांनी ग्रंथाला गुरु संबोधले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रगतीसाठी वाचन हा मंत्र दिलाय. आमच्या वेद.. उपनिषदे.. पुराणे.. गीता तसेच संत साहित्याने हे मनुष्य जीवन समृद्ध केलेय. या भूमितील व्यासमुनी असो वा वाल्मिकी जगविख्यात लेखक ठरलेत.*
*हीच परंपरा जगतगुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानदेवांनी १६ व्या वर्षी तत्वज्ञान सांगणारी ज्ञानेश्वरी, तर छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत भाषेत ग्रंथ लिहून कायम ठेवली.*
*गावातील ग्रंथालय हे गावाचे सांस्कृतिक वैभव आहे. वाचक म्हणजे देशातील सुज्ञ नागरिक अशी ओळख आहे. ग्रंथ वाचनामुळेच देशाला दिशा देणारे महापुरुष घडलेत. पुस्तक म्हणजे जीवनास धडा देणारा इतिहास.. जीवन सुखद करणारे वर्तमान आणि जीवन उन्नत करणारा भविष्यकाळ.*
*नविन पुस्तक उत्सुकतेने बघणे. त्याचा गंध अनुभवणे.. चाळणे.. वाचणे हा अवर्णनीय आनंद आहे. पुस्तक प्रेम करायला शिकवते. पुस्तक हे केवळ पुस्तकच नसते. पुस्तक आशा.. आकांक्षानी जीवन सदैव प्रवाही ठेवते. त्यात रमून स्वर्गीय सुखाची अनुभुती प्राप्त करता येते. पुस्तक ही प्रत्येकाची मर्मबंध ठेव असते.*
*_पुस्तकातील खूण कराया_*
*_दिले एकदा पीस पांढरे;_*
*_पिसाहुनि सुकुमार काहिसे_*
*_देता घेता त्यात थरारे._*
*_मेजावरचे वजन छानसे_*
*_म्हणून दिला नाजूक शिंपला;_*
*_देता घेता उमटे काही_*
*_मिना तयाचा त्यावर जडला_*
*_असेच काही द्यावे घ्यावे_*
*_दिला एकदा ताजा मरवा_*
*_देता घेता त्यात मिसळला_*
*_गंध मनातिल त्याहून हिरवा._*
*गीत : इंदिरा संत* ✍
*संगीत : गिरीश जोशी*
*स्वर : पद्मजा फेणाणी-जोगळेकर
*!! घरी रहा !! सुरक्षित रहा !!*
Ujjwala, mam, congratulations to you very much. Very nice activities. What you have written to justify today is very nice. Happy "Granth Din".
ReplyDeleteखुप छान पुस्तक दिनाच्या शुभेच्छा
ReplyDeleteMam Very nice
ReplyDeleteकरसाळे मॅडम, अतिशय सुंदर उपक्रम आहे. ब्लागही छान आहे.विशेषतः इंदिरा संतांची कविता वाचताना मनाला मोरपंखीस काही स्पर्शून गेलं.
ReplyDeleteखूप खूप छान मॅडम,
धन्यवाद!
मस्त
ReplyDeleteअभिनव उपक्रम..ग्रंथपालांना ब्लॉग काढून आशा पद्धतीने वाचनासाठी मंच उभा केलेला हे मी पहिल्यांदाच पाहिलं..खरच अभिनंदनीय आहे..
ReplyDeleteMadam this facility provides us excellent platform to be introduced with biographies. Thanks a lot for it, and wishes to it.
ReplyDeleteNice book
ReplyDeleteNice madam
ReplyDeleteTumacha ha upkram khup chan ahe madam. Tyamule vachnachi godi lagate
ReplyDelete