Skip to main content

एक होता कार्व्हर- अनुवाद वीणा गवाणकर

प्रिय वाचकांनो आज आपण ' एक होता कार्व्हर' या चरित्र पुस्तकाची ओळख घेणार आहोत.वीणा गवाणकर यांनी अनुवादित केलेली कार्व्हर यांची जीवनकहाणी. प्रकाशक दिलीप माजगावकर राजहंस प्रकाशन, किँमत १५० रू.
अमेरिकेतील मिझुरी राज्यात डायमंड ग्रोव्ह वाड्यावर मोझेस कार्व्हर आपल्या कुटुंबासह आणि मेरी नावाच्या गुलाम निग्रो स्त्री तिच्या दोन मुलांसह राहत होते.१८६०- ६२ दरम्यान मेरीला तिच्या एका मुलासोबत एका टोळीने रातोरात पळवून  नेली. मोझेस यांनी घोड्यांच्या बदल्यात सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु फक्त २ महिन्यांचा मुलगा मिळाला.निग्रोना त्याकाळी अमेरिकेत गुलाम म्हणून वागवले जायचे. मोझेस कार्व्हर सोबत निसर्गात हे अनाथ पोर वाढत होते. लहानणापासूनच रानावनात झाड झुडपे, पक्षांची पिल्ली, मासे यांच्या सोबतच मेरीचे पोर वाढत होते. या मेरीच्या पोराची प्रामाणिक व विनम्र वृत्ती पाहून कार्व्हर कुटुंबात त्याचं नामकरण केलं - जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. निसर्ग शाळेत शिकत असताना वनस्पतींशी जास्त परिचय होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत शिक्षण घेण्यासाठी स्वयंपाक, लाँड्री, बागकाम, गिरणीत काम, सरपण फोडून देणे, अंगण झाडून देणे,  गटार खणली,अशी अनेक कामे केली. अनेकदा झोपण्यासाठी गोठ्याचा वापर केला. दारिद्र्याने भरलेली झोळी आणि प्रखर ज्ञान पिपासा असल्याने कष्ट करून शिक्षण घेत राहिले. वनस्पतीशास्त्र व कृषी रसायन, भूमिती, प्राणीशास्त्र यशाखांचा अभ्यास केला. कितीतरी अधिक ज्ञान प्रत्यक्ष निसर्गातून मिळविले आणि त्यामुळेच इतरांच्या पुढे अभ्यासात असतं.१८९४ साली आयोवा स्टेट कॉलेज मधून विज्ञान शाखेची पदवी मिळवून पुढे त्याच कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून अध्यापनही केले. कृषिवर आधारित संशोधन त्यांच्या आयुष्याचा भाग बनला होता. शेती विकासासाठी वेगवेगळे प्रयोग केले. सेंद्रिय शेती, खत, संकल्पना प्रत्यक्षात आणली ती १८९६ मध्ये. ज्याची गरज आपल्याला आपणास १२० वर्षांनी जाणवते यातच त्यांच्या दूरदृष्टीची कल्पना येते.
यशाची एक एक पायरी चढत असताना त्यांनी जमिनीशी नात घट्ट ठेवले व शेती विषयक क्षेत्रात उच्चशिक्षण पूर्ण केले. लोकांच्या आजारावर उपलब्ध वनस्पतींचा वापर व त्याची माहिती सर्वांना करून देणे, मातीतून नीळा रंग शोधून काढला हे संशोधन  पेटंट घेवून ते श्रीमंत झाले नाही तर ते संशोधन गरीब जनतेला उपलब्ध करून दिले तेही त्यांना परवडणाऱ्या किमतीत. शेंगदाणा पासून तेल, डिंक, रबर वस्तू तयार केल्या. वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला देणगी दिली. भुईमुग, रताळ
 यापासून तब्बल ५०० च्यावर जीवनोपयोगी वस्तू तयार केल्या. आणि जगाच्या पाठीवर ज्यान इतिहासात सोनेरी कर्तृत्व केलं असे हे कार्व्हर . जगातील कोणत्याही शास्त्रज्ञाने केले नसेल एवढे कृषी संशोधन एकट्या कार्व्हर यांनी केले. प्रा. कार्व्हर हे शेती शास्त्रज्ञ तर होतेच ते अर्थशास्त्रज्ञ ही होते. शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत अन्नधान्य टिकविण्याच्या सुलभ पद्धती शिकविल्या.वाळवा, सुकवा तसेच स्वच्छ सूर्यप्रकाशात कोणते अन्नपदार्थ टिकविता येतात याचा याद्या प्रसिद्ध केल्या. अविवाहित कार्व्हरला पैशाचा मोह नव्हता त्यानी संशोधन केंद्रातील पगारवाढ घेतली नाही . शास्त्रज्ञ एडिसनने देवू केलेली एक लाख डॉलरची विनंती देखील मान्य केली नाही. त्यासाठी त्यांना न्यूजर्सीला जावे लागणार होते याबाबत कार्व्हर म्हणतात ' माझी माझ्या बांधवांना जास्त गरज आहे' काय अजब रसायन आहे माती अन माणसांची नाळ कायम ठेवणार! नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण आणि उपयोग मानवी जीवनाच्या समृध्दीच गमक आहे कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलं नाही तर त्याचा वस्तुपाठच घालून दिला आणि हा वस्तुपाठ समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.!ह्या पुस्तकाला उत्कृष्ठ वाडमय पुरस्कार 1981-82 यावर्षी मिळालेला आहे.

Comments

  1. थोर महात्मे होऊनी गेले चरित्र त्यांचे पहावे जरा, आपणही त्यांच्यासमान व्हावे हाचि सापडे बोध खरा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महात्मा जोतिबा फुले: एक समाज सुधारक

महात्मा जोतिबा फुले, भारताच्या सामाजिक पुनरुत्थानातील एक अग्रणी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. एका गरीब कुटुंबात जन्मलेले जोतिबा फुले यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजातील अनेक कुप्रथांवर चाबूक चालवला. शिक्षण आणि सामाजिक जागृती: जोतिबा फुले यांनी लहानपणापासूनच समाजातील असमानता आणि अन्याय पाहिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्रियांचे शिक्षण आणि दलित समाजाचे उत्थान यासाठी अथक प्रयत्न केले. भारतातील पहिल्या कन्या शाळेची स्थापना त्यांच्याच प्रयत्नांमुळे शक्य झाली. सत्यशोधक समाज आणि त्यांचे विचार: जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अंधश्रद्धा आणि कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी लिहिलेले 'गुलामगिरी' हे पुस्तक ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेवर एक जोरदार प्रहार होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकास शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. कार्याचा प्रभाव: जोतिबा फुले यांच्या कार्याचा भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाला. त्यांनी स्त्री शिक्षण, ...

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...