आज 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. भारतीय संविधानाचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ , समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतीय बौद्ध धर्माचे पुनरू ज्ज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. त्यांनी कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटले. डॉ. आंबेडकरांची बुध्दीमत्ता अफाट व अचाट होती. त्यांचे वाचन व लेखन फार मोठे होते. त्यांच्याकडे पंचवीस हजारांवर ग्रंथांचा व्यक्तिगत संग्रह होता. त्यांनी ग्रंथलेखन प्रामुख्याने इंग्रजीतूनच केलेले आहे. मराठी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन मराठीत दिसते. त्यांच्या सर्व ग्रंथांची मराठी भाषांतर उपलब्ध आहेत. योगदान - भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, घटनात्मक, औंद्योगिक क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. वाचनवेड , पुस्तक प्रेम - डॉ. आंबेडकर यांना वाचनाचे प्रचंड वेड ...