भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती १५ आॅक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणादिन साजरा केला जातो. डॉ. अब्दुल कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले.डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते. जसे त्यांच्या मध्ये असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन आणि दिलदार स्वभाव यामुळेच त्यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तुत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महसत्ता येणार आहे. भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे हे त्यांनी सांगितले आहे. डॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तिदायी आहे. तुम्ही सर्व काही करू शकता तुमच्याकडे अदभुत साहस आहे हे पटवून देण्यासाठी The Ignited Minsa , The Luminous Spark, Wings of Fire , पुस्तके लिहिली. तुमच्या मेंदूतील आणि चेतना मधील ठिणगीला ओळखले म्हणून त्यांनी प्रत्येकाकडे चेत नेची शक्ती आहे अगदी ...