Skip to main content

बलुतं - दया पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीचे महत्त्व अधोरेखित करणारे दया पवारांचे बलुतं हे पुस्तक मराठी साहित्यात महत्वाचे मानले जाते. दया पवारांना वाटतं त्याप्रमाणे यांचं जगणं म्हणजे एक कोंडवाडा आहे. समाजातील ज्या घटकाला वर्षानुवर्षे  गावकुसा बाहेर ढकलले गेले त्या घटकातील माणसांची एका विशिष्ट कालखंडातील जगण्याची धडपड बलुतं या आत्मकथानकातून अतिशय प्रांजळपणे व्यक्त झाली आहे. अत्यंत अन्यायकारक समाज व्यवस्थेमुळे वाट्याला आलेलं दुःखाचं बलुतं कुणाला सांगू नये इतकं दाहक आहे. हे दुःख मानवनिर्मित आहे. सदर आत्मकथेतील कालखंड १९४० च्या सुमाराचा आहे. बाबासाहेबांनी जागृती सुरू केली तो हा काळ. आत्मकथन म्हणजे एकप्रकारचा आरसाच आहे. फार काळापासुन भारतीय समाज हा जात, वर्ग व लिंगभेदाने बरबटलेला असून त्यात भांडवलशाहिने जणू भरच टाकलीय; अशा काळात मुंबईसारख्या शहरांमध्ये राहणं सामान्य माणसासाठी अगदी दुरापास्त होऊन बसले आहे. ह्या सगळ्या खटाटोपींध्ये आपलं अस्तित्त्व टिकविण्यासाठी कोणकोणत्या दिव्यांचा सामना करावा लागतो याचं यथार्थ चित्रण बलुतंमधून बघायला मिळतं. बलुतं हे आत्मचरित्र दया पवार याचे आहे. हे मराठी साहित्यातील पहिले आत्मचरित्र आहे. दलित समाजातील हळुहळु होणारे बदल तसेच मुंबई शहर बद्दलची माहिती देखील आलेली आहे. स्वतः ला कमी लेखणाऱ्या या मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर दगडू  मारुती पवारांचं बालपण कधी खेड्यात तर कधी शहरात गेले . दगडूचे वडील दादा मुंबईला सुक्या गोदीत कामाला होते. मुंबईला कावाखाना इथे ते राहत. एका बाजूला चोरबजार तर दुसऱ्या बाजूला कामाठीपुरा. नागपाड्याच्या म्यूनसिपल शाळेत दगडूच शिक्षणझालेलं.
लेखकाची आई कागद गोळा करायची. पगार झाला की वडील गायब व्हायचे. वडिलांची तब्ब्येत खालावली त्यामुळे नोकरी सुटते व परत गावी येतात. शाळेत शिक्षकांकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी संदर्भात माहिती मिळते. इकडे वडिलांचं आजारपण वाढत जातं. अंगार, धुपारे, मांत्रिक उपचार सुरू असतात मात्र दवाखान्यात दाखल करण्यात येत नाही तशी मानसिकताच नसते. त्यामुळे वडिलांचे निधन होतो . एखाद्या समाजातील लोकं केवळ अज्ञानामुळे असे हाल होवून मरतात ही गोष्ट वाचकाला अस्वस्थं करून जाते. आत्मकथनात वर्णन केलेला महारवाडा बाबासाहेबांची सामाजिक चळवळ सुरू झाली त्याकाळातला आहे. हा महारवाडा काळजावर जखम व्हावी असा आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची आई कंबर कसते. बाबासाहेबांचे विचार तिने ऐकलेले असतात. कुठेतरी शिक्षणाचे महत्त्व तिला जाणवते . ती लेखकाला शिक्षणासाठी तालुक्याला पाठवते. शिक्षणामुळे दगडूच्या आचारात, विचारात फरक पडतो. पुढे नोकरी करतात. आपल्या आईने मार्केट मध्ये कागद वेचू नये त्यांनी आपली अप्रतिष्ठा होते असे त्यांना वाटते. लेखकाचे म्हणणे कितीही खरे असले तरी आईने ऐकायला तर हवे? आई मुलाचा हा संघर्ष निव्वळ दोन पिढ्यांतील नाही तर सामाजिक स्तरातला देखील आहे. 
आत्मकथनातून येणाऱ्या निरनिराळ्या व्यक्तीरेखातून समाजाच्या स्तरातला सामाजिक आणि सांस्कृतिक फरक लक्षात येतो. या बदलामुळे सुशिक्षित झाल्यावर लेखकाची होणारी भावनिक कुचंबणा वाचकाला  व्यथित करते.या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महात्मा जोतिबा फुले: एक समाज सुधारक

महात्मा जोतिबा फुले, भारताच्या सामाजिक पुनरुत्थानातील एक अग्रणी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. एका गरीब कुटुंबात जन्मलेले जोतिबा फुले यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजातील अनेक कुप्रथांवर चाबूक चालवला. शिक्षण आणि सामाजिक जागृती: जोतिबा फुले यांनी लहानपणापासूनच समाजातील असमानता आणि अन्याय पाहिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्रियांचे शिक्षण आणि दलित समाजाचे उत्थान यासाठी अथक प्रयत्न केले. भारतातील पहिल्या कन्या शाळेची स्थापना त्यांच्याच प्रयत्नांमुळे शक्य झाली. सत्यशोधक समाज आणि त्यांचे विचार: जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अंधश्रद्धा आणि कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी लिहिलेले 'गुलामगिरी' हे पुस्तक ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेवर एक जोरदार प्रहार होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकास शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. कार्याचा प्रभाव: जोतिबा फुले यांच्या कार्याचा भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाला. त्यांनी स्त्री शिक्षण, ...

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...