Skip to main content

स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक

1936 साली  प्रथम प्रकाशित झालेले स्मृतिचित्रे झालेले हे पुस्तक आज 85  वर्षे झाली तरी वाचकांना तितकेच भावते आहे. लक्ष्मीबाईंनी गप्पा मारताना हकीकती सांगाव्यात तशी ही स्मृतिचित्रे रेखाटली आहे. लक्ष्मीबाईचे लहानपणीचे नाव मनकर्णिका. त्यांचे 11 व्याा वर्षीच लग्न झाले व त्यांचे नाव मनकर्णिका गोखले चे लक्ष्मीबाई नारायण टिळक झाले. यात लक्ष्मीबाई आपल्या पतीच्या आठवणी सांगताना कायम त्यांचा उल्लेख ' टिळक' असा करतात. त्यांनी सांगितलेल्या आठवणीत लहानसहान प्रसंगातील नाट्य पकडण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. पुढे आपल्या मुलाच्या सांगण्यावरून त्या लिहू लागतात. आठवणी लिहू लागल्यावर त्या सुचेल तसं ते कधी खडूने, तर कधी कोळशाने जमिनीवर लिहून काढीत त्या बोलत तशाच लिहीत. हा लेखन प्रकार त्या काळात वेगळाच होता. अखेर १९३४ साली स्मृतिचित्रेचा पहिला भाग प्रसिद्ध झाला. 
लग्नानंतर पितृसत्ताक  जीवन पद्धती काळात आजची तरुण पिढी कल्पना देखील करू शकणार नाही इतकी विचित्र. स्त्रियांना साधी लुगडी घ्यायची तरी घरातील कर्त्या पुरुषावर अवलंबून रहावे लागे. लक्ष्मीबाईच्या ललाटी देखील सुरुवातीला तेच होते. सासरे स्वभावाने तिरपागडे त्यात टिळक मध्येच गायब होत. एका ठिकाणी शिक्षकाची नोकरी करत तिथे एका योग्याच्या नादी लागले. भर दिवसा रानावनात जावून ध्यान करत तर कधी नदीत बसून गुरुमंत्र म्हणत. टिळक लक्ष्मीबाईंनी शिकावे म्हणून पुस्तके घेवून जातात व शिकवताना लक्ष्मी बाई हसतात तर सगळी पुस्तके फाडून जाळून टाकतात असे टिळक रागीट.
राजनांदगाव येथील दोन वर्षात टिळकांच्या मनःस्थितीत बराच बदल होतो ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित व तो धर्म स्वीकारतात. मात्र लक्ष्मीबाई हिंदूच राहतात. पुढचा संसाररथ आता दोन चाके भिन्न विचारधारांची असतात. त्या घराला आता भिन्न प्रवृत्तीच्या माणसांचे अनेक दाहक अनुभव येतात हा सारा भाग अतिशय प्रांजळपणे पुस्तकात आलेला आहे. अत्यंत कठीण आणि परीक्षेचा काळ! याकाळाशी त्यांनी दिलेली झुंज वाचकाला अंतर्मुख करते. कथानकाच्या ओघात बालकवींच्या आठवणी, पतीचा मृत्यू, दुष्काळातील समाजसेवा, कराचीतील वास्तव्य यागोष्टी अतिशय प्रभावीपणे येतात.
आचार्य अत्रे यांनी या पुस्तकाची तुलना महात्मा गांधी यांच्या सत्याचे प्रयोग या पुस्तकांशी केली. ते म्हणतात " महात्मा गांधीनी सत्याचे प्रयोग लिहताना जो मोकळेपणा आणि निर्भयता दाखवली, तीच गोष्ट स्मृतिचित्रेमध्ये आढळते. आज एवढ्या वर्षानंतर देखील वाचकांचे या पुस्तकावर निस्सीम प्रेम आहे.

Comments

  1. अतिशय निर्व्याज आणि आपुलकीने,प्रांजळपणे लिहिलेले हे चरित्र आहे. साधी,सोपी,घरगुती वळणाची,अनलंकृत मराठी भाषा,ना. वा
    टिळकांसारखा तिरसट व विचित्र स्वभावाचा नवरा,सोवळे-ओवळे.... तरीही जीवनावर प्रेम करणाऱ्या लक्ष्मीबाईचे चरित्र म्हणजे खरोखरच आठवणीतील सुखद ठेवा आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महात्मा जोतिबा फुले: एक समाज सुधारक

महात्मा जोतिबा फुले, भारताच्या सामाजिक पुनरुत्थानातील एक अग्रणी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. एका गरीब कुटुंबात जन्मलेले जोतिबा फुले यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजातील अनेक कुप्रथांवर चाबूक चालवला. शिक्षण आणि सामाजिक जागृती: जोतिबा फुले यांनी लहानपणापासूनच समाजातील असमानता आणि अन्याय पाहिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्रियांचे शिक्षण आणि दलित समाजाचे उत्थान यासाठी अथक प्रयत्न केले. भारतातील पहिल्या कन्या शाळेची स्थापना त्यांच्याच प्रयत्नांमुळे शक्य झाली. सत्यशोधक समाज आणि त्यांचे विचार: जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अंधश्रद्धा आणि कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी लिहिलेले 'गुलामगिरी' हे पुस्तक ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेवर एक जोरदार प्रहार होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकास शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. कार्याचा प्रभाव: जोतिबा फुले यांच्या कार्याचा भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाला. त्यांनी स्त्री शिक्षण, ...

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...