Skip to main content

सत्याचे प्रयोग- मोहनदास करमचंद गांधी

मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी यांचे आत्मकथन सत्याचे प्रयोग या पुस्तकाची ओळख आज आपण करून घेणार आहे. वरदा प्रकाशन ने प्रकाशित केले आहे हे पुस्तक. ह्या पुस्तकातील भाषा सरळ, बाळबोध वळणाची असली तरी अत्यंत आशयघन आहे.या पुस्तकाची गणना २० व्या शतकात महत्वाच्या पुस्तकात केली गेलेली आहे.
महात्मा गांधी यांनी जीवनभर कशी वाटचाल केली याचा मागोवा यात घेतला आहे.मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी भाषांमध्ये हे पुस्तक उपलब्ध असून जगातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेले हे पुस्तक आहे. यात गांधीजींनी त्यांच्या लहानणापासून ते १९२१ पर्यंतचे आयुष्य रेखाटलेले आहे.या पुस्तकाची प्रस्तावना स्वतः गांधीजींनी लिहली असून त्यात त्यांनी सांगितले आहे की येरवडा कारागृहातील सहकारी कैदी जेरमदास यांच्या आग्रहामुळे त्यांनी हे आत्मचरित्र लिहिले. त्यांनी बालपणात वाचलेली दोन पुस्तके त्यांचा परिणाम खूप होता असे सांगितले सत्यवान हरिशचंद्र या पुस्तकाचा प्रभाव तर एवढा होता की ते स्वतः ला हरिशचंद्र समजून अनेकवेळा कल्परंजन करीत. तसेच गीतेचे ७०० श्लोक कसे दृढनिश्चयाने पाठ केले याचे ही  वर्णन केले आहे.
गांधीजींचे आयुष्य उघड्या पुस्तका सारखे होते. त्यांनी आयुष्यातील धक्कादायक गोष्टी समाजापासून लपवून ठेवल्या नाहीत त्यांनी त्या आपल्या आत्मचित्रात लिहून जगाला सांगितल्या. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना याव्यक्तीला आपण केलेली चोरी, वासना आदी गोष्टी याची वाच्यता जाहीर करताना संकोच वाटला नाही. " मी पहिली चोरी केली तेव्हा खूप रडलो आता काय करावे कळेना. शेवटी ठरवले की वडिलांना सत्य सांगायचे" असे  ठरवून वडिलांना सांगणारा मोहन आपल्यातीलच एक वाटतो.
ब्रह्मचर्य हा केवळ देहाचा अलंकार नाही ती मनाची उत्तुंगता आहे हे उत्तुंगपण आपण अजुन मिळवू शकलो नाही असा संशय असल्याने स्वतः ची परीक्षा घेण्यासाठी गांधीजींनी अखेरच्या पर्वात सत्याचे प्रयोग करून पाहिले त्यासाठी त्यांनी आपली प्रतिमा पणाला लावली .आपली ही परीक्षा त्यांनी जगापासून लपविली नाही. माझे जीवन हाच माझा संदेश आहे असे सांगणाऱ्या गांधीजींचा हाच प्रामाणिक आदर्श घेत लाखो लोकांनी प्रेरणा घेतली आहे. आपलं पूर्वायुष्य सामान्य माणसांप्रमाणेच जगलेल्या सामान्य माणसा सारख्या चुका केलेल्या ह्या माणसाचा हा असामान्यत्वा पर्यंतच्या प्रवासापुढे आपण नतमस्तक होतोच आणि आपणही असे काही असामान्य करू शकतो याची न कळत स्फूर्ती मिळते.

Comments

  1. सत्य हा या आत्मचरित्राचा गाभा आहे. महात्मा गांधी सारखा माणूस या पृथ्वीतलावर जन्माला येऊन गेला यावर कदाचित पुढील पिढी विश्वास ठेवणार नाही असे महान शास्त्रज्ञ आइन्स्टाइन म्हणाले होते ते हे पुस्तक वाचल्यानंतर खरे वाटते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन - इंग्रजी विभागा मार्फत भित्तीपत्रकाचे उद्घाटन

23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट दिवस म्हणून ओळखला जातो. 1995 या वर्षी पासून जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी  भारतातही पुस्तकदिन साजरा केला जातो. लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी भारतातील अनेक भागांमध्ये त्यांचे स्मरण केले जाते. या वर्षीची थीम " तुमच्या मनाला जे आवडेल ते वाचा" आहे.मनाप्रमाणे वाचता आलं तरच मनाप्रमाणे सुंदर जगता येईल. ही थीम मुलांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर वाचनाचा शोध घेण्यास प्रोत्साहित करते. वाचनाची आवड निर्माण करते आणि पुस्तकांच्या जगात त्यांची स्वतःची शैली आणि आनंद शोधण्यासाठी त्यांना सक्षम करते.   मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागा मार्फत जागतिक दिनानिमित्त विल्यम शेक्सपिअर ह्यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, त्यांना मिळालेले पुरस्कार, बक्षीस ह्यासंबंधीत माहिती देणारे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे स्वागत व  प्रास्ताविक बी. ए. भाग एक चा विद्यार्...

मोहनराव पतंगराव पाटील बोरगाव महाविद्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त अभिवादन.

 आज महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. कुंडले होते त्यांनी आपल्या भाषणात  महाराष्ट्रात महात्मा जोतीराव फुले यांच्या विद्रोही विचारपरंपरेने व कर्तृत्वाने सामाजिक बदलाचा एक नवा प्रवाह घडला असे नमूद केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमात बी. ए. भाग तीन चे विद्यार्थी कु. मोनिका डांगे, कु. देवराज शेवाळे यांनी ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश बुरुटे यांनी केले.  महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त  त्यांच्या संबंधित माहिती असलेले e resources पुढील प्रमाणे आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा. ज्योतिबा फुले Jyotiba Phule सावित्रीबाई फुले Savitribai Phule MARATHI, HINDI, ENGLISH BOOKS          📚 मराठी बुक्स 📚 1) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समग्र...

14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या पुस्तकप्रेमा बद्दल .....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकप्रेमाचा सर्वात मोठा दाखला म्हणजे लोकं स्वतःसाठी घर बांधतात पण त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं होतं. 1933 साली दादरच्या हिंदू कॉलनीत सुरेख अस दुमजली घर बांधले. राजगृह - या पुस्तकांच्या घराचं नाव त्यांनी एका विद्वानाच्या घराच्या नावावरून ठेवलं. हा विद्वान म्हणजे गौतमबुद्ध त्यांच्या राजेशाही घराच नाव राजगृह होते. त्यांच्या  या पुस्तकघरात आजही लाखांवरची पुस्तके आहेत. पण त्यांनी जेव्हा ही घर बांधल तेव्हा त्यात विविध विषयांवरची शेकडो पुस्तके होती. त्यामध्ये तत्त्वज्ञानाची 6000, अर्थशास्त्राची 1हजार, युद्धशास्त्राची 3 हजार, धर्मशास्त्राची 2हजार, कायद्याची 5 हजार पुस्तके  होती. आपल्या या पुस्तकांच्या घरात बाबासाहेब तासनतास ग्रंथ वाचत बसायचे त्यामुळेच बाबासाहेबांना प्रज्ञासुर्य असंही संबोधले जातं.  असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकांसाठी खास  घर बांधणारी ही एकमेव व्यक्ती असून  त्यांना विनम्र अभिवादन! संदर्भ.... https://www.esakal.com/ampstories/web-story/dr-babasaheb-ambedkar-personal-library-house-rajgruh-collection-of-...