सुप्रसिद्ध संगीतकार कै.सुधीर फडके म्हणजे बाबूजींचे अपुरे आत्मकथन. आपल्याला यशस्वी व्यक्तींना मिळालेले यश दिसते परंतु त्यापाठीमागे त्यांनी केलेले कष्ट दिसत नाही. सुधीर फडके. नावारूपाला येण्याआधी काय संघर्ष केला ते हे पुस्तक वाचल्यावर कळते. त्यांना उत्तर आयुष्यात मिळालेले यश अपयश त्यावर मात करणारी त्यांची जिद्द याचे प्रभावी दर्शन घडवणारे हे पुस्तक सुद्धा लोकप्रियतेचे उच्चांक प्रस्थापित करणारे ठरले आहे.यांचे मूळ नाव रवींद्र विनायक फडके. भटकत आणि कंगाल अवस्थेतही संगीत साधना करीत राहिलेला एका कलंदर कलावंताचे विलक्षण पारदर्शी आत्मकथन आहे. हे आत्मचरित्र संपूर्ण नाही. या पुस्तकात ललिता फडके यांनी सांगितलेल्या अनेक आठवणी असंख्य दुर्मिळ छायाचित्रे यांच्या समावेशामुळे पुस्तकाच्या मौलिकतेत भर पडली आहे. संगीताशी कधीच संबंध आला नाही तरी देखील बाबूजींनी मरण यातना भोगल्या व संगीताची नाळ कायम जोडलेली ठेवली.
घरच्या गरिबीमुळे नातेवाईकांच्या , मित्रांच्या आधारावर जगायला लावलं. उपासमार सहन करावी लागली, भूक काय असते तिची किँमत काय असते, माणसाला वेड लागते म्हणजे काय होते कधी आत्महत्या करून सुटका करावी असे विचार त्यांच्या मनात येत होते. उधार उसनवार करून गाण्याच्या जीवावर आयुष्य सावरायचा त्यांनी केलेला प्रयत्न दिसतो. प्रत्येक वेळी नियती मात्र आशा, निराशा यश अपयश हेलकावे देत होती हे वाचून अंगावर काटा येतो. तोल न जाऊ देता मान अपमान, दुःख, दारिद्र इत्यादी शब्दांचा खरा अर्थ जगत अनुभूती घेतली. इतका खडतर प्रवास, अनेकदा मृत्यूला सामोरी जावेला लागलं . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणे तरीही संगीता बद्दल कुठे तरी मनात विश्वास, आस्था जपणे, एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे हे गीत जणू त्यांच्या जीवनाला चपखलपणे लागू होणारे आहे. राजहंस प्रकाशनाने २००३ मध्ये प्रथम आवृत्ती प्रकाशित केली. गीत रामायण ज्यांनी अजरामर करून ठेवले त्या बाबूजीचे आत्मचरित्र मनाला चटका लावून जाते.
Mast
ReplyDeleteNice book
ReplyDeleteगीतरामायण ही अभिजात आणि उत्कृष्ट संगीत कलाकृती आहे.
ReplyDelete