वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन संविधान उद्देशिकेचे वाचन करून तसेच पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाची खात्री या भित्तीपत्रकाचे मा. कुमारराव निकम यांच्या हस्ते उद्घाटन करून साजरा करण्यात आला. भारताचे महान वैज्ञानिक, मिसाईल Man म्हणून ओळखले जाणारे, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस. त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून त्यांनी दिलेला वाचल तर वाचाल या संदेशाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्म दिवस वाचनप्रेरणा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2015 पासून हा दिवस वाचन प्रेरणा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. डॉ. कलाम यांचे जीवन म्हणजे ज्ञानाची अखंड साधना होती. त्यांची गरिबीतून राष्ट्रपती पदापर्यंतची भरारी ही केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेवर व वाचनावरील निस्सिम प्रेमामुळेच शक्य झाले . पुस्तके त्यांचे मित्र होते. त्यांनी अनेक तरुणांना वाचनातून आत्मशोध व प्रगतीचा मार्ग शोधण्यासाठी प्रेरित केले. आजच्या या प्रेरणादिन कार्यक्रमा...